हिळ्ळी येथे अवैध वाळू उपसा, एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:23 AM2021-04-27T04:23:16+5:302021-04-27T04:23:16+5:30

एका ट्रॅक्टरमध्ये (केए ३२ टी ९४४१) हिळ्ळी येथील भीमानदी पात्रात वाळू भरणे सुरू होते. तेव्हा याची माहिती एकाने उपविभागीय ...

Illegal sand extraction at Hilli, one charged | हिळ्ळी येथे अवैध वाळू उपसा, एकावर गुन्हा दाखल

हिळ्ळी येथे अवैध वाळू उपसा, एकावर गुन्हा दाखल

Next

एका ट्रॅक्टरमध्ये (केए ३२ टी ९४४१) हिळ्ळी येथील भीमानदी पात्रात वाळू भरणे सुरू होते. तेव्हा याची माहिती एकाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना दिली. पोलिसांना त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ते तेथील ट्रॅक्टर घेऊन अक्कलकोटकडे येताना पुन्हा एक फोन आला. कोणीतरी ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा जाऊन पाहिले असता आणखीन एका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून विचारले असता अरेरावी, धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे १ लाख रुपये किमतीची ट्रॉली, ५ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी राजशेखर यादवाड याच्या विरोधात शासकीय कामात अढथळा, चोरी या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस काॅन्स्टेबल दासरी करीत आहेत. याबाबत ठाणे अंमलदार उत्तम खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलीस नाईक गोपाल बुक्कानुरे, डोळ्ळे, पोलीस उत्तम खंडागळे यांनी केली आहे.

Web Title: Illegal sand extraction at Hilli, one charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.