अवैध वाळूमाफियांचे गावठी कट्ट्याला ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 09:56 AM2019-04-22T09:56:45+5:302019-04-22T09:58:23+5:30

एकेकाळी कट्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उमदी व चडचण (ता. इंडी) परिसर पुन्हा कट्ट्यांचे माहेरघर बनले आहे. तेथूनच अक्कलकोट सह सीमा भागात याचा प्रवेश होत आहे.

Illegal sand mining hawkers 'power' | अवैध वाळूमाफियांचे गावठी कट्ट्याला ‘बळ’

अवैध वाळूमाफियांचे गावठी कट्ट्याला ‘बळ’

Next
ठळक मुद्देगावठी कट्टे कोण बनवतंय याचा शोध घेतला असता हे कट्टे लोहाराचे काम करणारे कारागिरच करतात, हे समोर आले.इंडी तालुक्यातील भीमा नदीकाठावर कट्टे बनविणाºयांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात क्षर्री नाही मिळाली तर सायकल, मोटरसायकलच्या चाकात वापरले जाणारे बेरिंगचा गोळ््या म्हणूनही वापर

जगन्नाथ हुक्केरी 

सोलापूर : अक्कलकोटसह दक्षिण तालुक्यातील भीमा नदीकाठ सध्या अवैध वाळू माफियांमुळे नेहमीच धगधगत आहे. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यांचा मोठ्या प्रमाणात मुक्तहस्ते वापर होत असून, एकेकाळी कट्ट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उमदी व चडचण (ता. इंडी) परिसर पुन्हा कट्ट्यांचे माहेरघर बनले आहे. तेथूनच अक्कलकोट सह सीमा भागात याचा प्रवेश होत आहे.

अवैध वाळू वाहतूक व उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने पथकावर पथकांची नियुक्ती केली; मात्र काही केल्या यावर आळा बसेना. कारण वाळू माफियांचे ‘गुंडाराज’ कारणभूत ठरत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. भीमा असो व सीना नदीकाठ तेथे दहा-बारा वर्षांच्या पोरांपासून ते पोक्त माणसं यात गुंतलेली आहेत. सूर्य मावळतीकडे चालला की कट्ट्यांमध्ये ‘क्षर्री’ म्हणजे गोळ्या भरण्याचे काम सुरू होते. पँटीचा खिसा, बनियनमध्ये, पाठीमागे पँटीत अन् काही लोक मुक्तपणे दुचाकीच्या हेडलाईटला कट्टे लावूनच फिरतात. सर्वात कहर म्हणजे जीप किंवा तत्सम चारचाकी वाहनांच्या बॉनेटवर कट्टे  ठेवून वाळूच्या गाड्या सुरक्षितपणे ठरलेल्या ठिकाणी पोहोचविण्याचे    काम केले जाते.

नदीपात्रामध्ये वाळू उपसा करून गाडी भरेपर्यंत वाळू माफिया आपल्या सैनिकांमार्फत परिसरात लक्ष ठेवतात. कोणी अनोळखी माणूस दिसला की, ‘कट्ट्यांचे कारस्थान’ सुरू होते. ही व्यक्ती शासकीय असो अथवा कोणीही. वाळू गाड्या निघाल्या की पुढे दोन-चार दुचाकीवर ट्रीपल सीट व त्यापेक्षा जास्त माणसे तीही कट्टेधारी. पाठीमागे बसलेला हा कट्टे हातात धरून उलट दिशेने बसलेला असतो. त्याच्या मागोमाग बॉनेटवर आणि हातात कट्टे धरलेली जीपमधील माणसं आणि गाडीच्या पाठीमागेही असाच ताफा असतो.

या कामासाठी त्यांना वाळू माफियांकडून पगाराबरोबरच बक्षीसही दिले जाते. यामुळे हे काम नव्याने उदय पावलेले हे ‘कट्टेधारी’ आपली सेवा इमाने इतबारे वाळू माफियांच्या चरणी अर्पण करतात. यामुळेच सध्या नदी काठावर कट्ट्यांचे राज्य चांगलेच हैदोस घालत आहे. पूर्वी कट्ट्यांसाठी प्रसिद्ध असलेला उमदी व चडचण परिसर आजही गावठी कट्टे व क्षर्री पुरविण्याचे काम करीत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पण या कट्ट्यांचा प्रवेश बंद करण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. निवडणुकीच्या काळात परवान्याची हत्यारे जमा करून घेणारी यंत्रणा मात्र कट्ट्याच्या बाबतीत उदासीन असल्याने निवडणुकांमध्ये हे कट्टे स्वसंरक्षणाबरोबरच घातपातासाठी वापरले जातात, हेही पुन्हा एकदा नव्याने समोर येत आहे. 

कट्टे अन् क्षर्रीचे जन्मदाते
गावठी कट्टे कोण बनवतंय याचा शोध घेतला असता हे कट्टे लोहाराचे काम करणारे कारागिरच करतात, हे समोर आले. यामुळे या कट्ट्यांचे जन्मदाते तेच आहेत, हे सिद्ध झाले. इंडी तालुक्यातील भीमा नदीकाठावर कट्टे बनविणाºयांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. कट्ट्याबरोबरच क्षर्रीही तेच बनवितात. क्षर्री नाही मिळाली तर सायकल, मोटरसायकलच्या चाकात वापरले जाणारे बेरिंगचा गोळ््या म्हणूनही वापर करतात. 

Web Title: Illegal sand mining hawkers 'power'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.