पानगावात ४८ लाखांचा अवैध वाळू साठा जप्त करून तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:06+5:302021-06-09T04:28:06+5:30

यात अंकुश बाबू भिसे, धनाजी कृष्णाजी मोरे, हनुमंत रामदास तिखांडे (सर्व रा. पानगाव ता.बार्शी.) या तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा ...

Illegal sand stocks worth Rs 48 lakh seized in Pangaon | पानगावात ४८ लाखांचा अवैध वाळू साठा जप्त करून तिघांवर गुन्हा

पानगावात ४८ लाखांचा अवैध वाळू साठा जप्त करून तिघांवर गुन्हा

Next

यात अंकुश बाबू भिसे, धनाजी कृष्णाजी मोरे, हनुमंत रामदास तिखांडे (सर्व रा. पानगाव ता.बार्शी.) या तिघांविरुद्ध तालुका पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

फिर्यादीत म्हटले की, पानगाव येथील गट नंबर १९२ मध्ये ५६० ब्रास, गट नंबर १४१ मध्ये ७० ब्रास, गट नं. १३८ मध्ये २२ ब्रास, गट नं. १३८/१ /ब मध्ये ३५ ब्रास, असा एकूण ६८७ ब्रास सुमारे ४८ लाख ९ हजार रुपये किमतीचा वाळूसाठा ५ जून २१ पूर्वी वरील तिघांनी केला. त्यांनी पर्यावरण नियमांची पायमल्ली केली म्हणून अंकुश बाबू भिसे, धनाजी कृष्णाजी मोरे, हनुमंत रामदास तिखांडे (सर्व रा. पानगाव, ता.बार्शी.) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत.

----

Web Title: Illegal sand stocks worth Rs 48 lakh seized in Pangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.