डिक्कीत बसणाºया इवल्याशा हेल्मेटला सोलापुरातील दुचाकीस्वारांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:59 PM2018-12-28T12:59:59+5:302018-12-28T13:10:40+5:30
सोलापूर : गाडीच्या डिक्कीत सहज ठेवता येईल, डोक्यावर असतानाही मोबाईलवर बोलता येईल व हाताळणीसाठीही अत्यंत कमी वजन असेल असे ...
सोलापूर : गाडीच्या डिक्कीत सहज ठेवता येईल, डोक्यावर असतानाही मोबाईलवर बोलता येईल व हाताळणीसाठीही अत्यंत कमी वजन असेल असे छोटे हेल्मेट खरेदी करण्यासाठी सोलापुरातील दुचाकीस्वारांची शहरात सर्वाधिक पसंती दिसून येत आहे. विशेष म्हणजे यादृष्टीने सोयीचे होईल असे स्वस्त हेल्मेट शहरात चौकाचौकात दिसून येत आहेत. बाहेरील राज्यातून विक्रीसाठी २०० ते २५०चा हेल्मेट घेण्याचा कल दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांना पाचशे रुपयांचा दंड भरण्यापेक्षा स्वस्तातील हेल्मेट घेतलेलाच बरा अशी भूमिका दुचाकीस्वारांची दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोलापुरात हेल्मेटची सक्ती केल्यापासून गत दोन दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हेल्मेट नसणाºया दुचाकीस्वारांना समज देत तर काही ठिकाणी दंड आकारून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. प्रत्येक चौकात हेल्मेटविना असलेल्या दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीस लक्ष ठेवून असल्याने हेल्मेट खरेदी करण्याचा कल दुचाकीस्वारांचा वाढला आहे.
सोलापुरात हेल्मेटची सक्ती लागू झाल्याची बातमी आंध्रातील व अन्य जिल्ह्यातील हेल्मेट विक्रेत्यांना लागल्यानंतर तेथून गत दोन दिवसात सोलापुरात टेम्पो भरून हेल्मेट विक्रीसाठी येत आहेत. सोलापुरातील विजापूर, हैदराबाद, पुणे आदी प्रमुख मार्गांसह शहरातील प्रमुख चौकात हेल्मेट घेऊन आलेला टेम्पो दिसत आहे. हाताळणी करण्यास सोयीचा ठरणारा अर्धवट हेल्मेट अडीचशे ते तीनशे रुपयांना त्यांच्याकडून विकण्यात येत आहे. तर पूर्ण डोके झाकणारा हेल्मेट चारशे रुपयांना विकण्यात येत आहे आयएसओ मार्क असलेलेच सर्व हेल्मेट या ठिकाणी दिसून येत असले तरी त्याच्या गुणवत्तेबाबत मात्र दुचाकीस्वारांकडून शंका घेण्यात येत आहे. गाडीलाच लॉक होईल असा हेल्मेटही खरेदी करण्यासाठी दुचाकीस्वारांची पसंती दिसून येत असून हेल्मेट घेतल्यानंतर दुचाकीला यासाठी लॉक सिस्टीम करून घेण्यात असल्याचेही दिसून येत आहे.
अडीचशे रुपयांत हेल्मेटची डोकेदुखी घालवली
- सोलापुरात बाहेरील राज्यातून विक्रीसाठी आलेल्या स्वस्त हेल्मेटची खरेदी करण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर ग्राहकांची झुंबड उडताना दिसून येत आहे. हाताळण्यास सोयीचे ठरणारे, अर्धे डोके झाकणारे हेल्मेट फक्त अडीचशे रुपयांना मिळत असल्याने हेल्मेट सक्तीची डोकेदुखी घालविण्याची भूमिका अनेक दुचाकीस्वार घेताना दिसून येत आहेत.