मी कंटाळलोय.. कारखान्याला नव्या नेतृत्वाची गरज; धर्मराज काडादींचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 10:42 AM2021-11-25T10:42:06+5:302021-11-25T10:42:12+5:30
धर्मराज काडादी : निवडणुकीच्या बैठकीत चिमणीवर चर्चा
सोलापूर : चांगलं काम करताना टीकाटिपणी मतभेद होत असतात स्व आप्पाना शेवटच्या काळात त्याचा खूप त्रास झाला परंतु संयमाने त्यांनी तोंड दिले तोच वारसा मी जपतोय आता मात्र मी कंटाळलोय नव्यांना संधी दिली पाहिजे असे मत श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी मांडले
कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यावर विचार विनिमय करण्यासाठी कार्यक्षेत्रातील राजकीय नेते आणि सभासदांची बैठक आप्पासाहेब काडादी मंगल कार्यालयात बोलावण्यात आली होती अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे होते. उपस्थित नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी धर्मराज काडादी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील, राजशेखर शिवदारे, शिवशरण बिराजदार, बाळासाहेब शेळके, शिवानंद दरेकर, शरण काडादि, ,आनंद तानवडे , सुरेश हसापुरे, कल्याणराव पाटील, जाफरताज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणुकीसाठी बोलावलेल्या सभेत कारखान्याच्या चिमणी पाडकामाची चर्चा अधिक रंगली सिद्धेश्वरची चिमणी पाडण्यामागे राजकारण आहे. चिमणी पाडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे त्यामुळे धर्मराज काडादी यांच्या सोबत राहून कारखान्याच्या विरोधात काम करणाऱ्या मंडळींना नेत्यांनी इशारेही दिले. आगामी निवडणुकीत उमेदवार निवडीचे अधिकार धर्मराज काडादी यांना देण्यात यावेत अशा सूचना करण्यात आल्या त्यावर ज्येष्ठ आणि सर्वपक्षीय नेत्यांची समिती स्थापन करण्याची कल्पना काडादी यांनी मांडली.
प्रास्तविक काडादी यांनी कारखान्याच्या गाळप हंगाम , आर्थिक अडचणी आणि चिमणी पाडण्यासाठी संभाव्य कारवाई यावर भाष्य केले. शरद पवार, ज्योतिरादित्य शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार, एकनाथ शिंदे या मंडळींनी नेहमीच सहकार्य केले आहे. कायदेशीर लढाई सुरूच आहे, मात्र विमानतळापेक्षा काडादी घराण्यावरील द्वेषापोटी काही मंडळी चिमणीसाठी अडून बसल्याचा आरोप त्यांनी केला. चिमणी आणि निवडणूक या दोन्ही मुद्द्यांवर राजशेखर शिवदारे , सिद्धाराम म्हेत्रे, शिवानंद दरेकर, बाळासाहेब शेळके, शिवशरण पाटील , दत्ता घोडके , भीमाशंकर जमादार, चंद्रकांत सुर्वे यांनी काडादी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
---------
... आणि काडादी झाले भावुक
चिमणीचे निमित्त करून काहीजण काडादी कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्व आप्पानाही शेवटच्या काळात असा त्रास सोसावा लागला. काडादी कुटुंबाला त्रास झाला तरी चालेल पण कारखान्याला त्याची झळ बसते असे सांगता सांगता धर्मराज काडादी यांना अश्रू अनावर झाले. काही क्षण ते भावनाविवश झाले. त्यानंतर आमच्या विरोधात काम तरा पण संस्थेला वेठीस धरू नका असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला .
--------
चिमणी नियमाला धरूनच.....आणखी प्रयत्न करू
चिमणी पाडली तर कारखाना बंद करावा लागेल . चिमणीच्या बांधकामास मंजुरी मिळण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. नियमाला धरूनच चिमणीचे बांधकाम केले आहे. व्यक्तिगत द्वेषातून चिमणी पाडण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दबाव आणला जात आहे .तरीही आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ती नियमित करून घेऊ, असा विश्वास धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला.
--------