पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:56 AM2017-12-12T10:56:24+5:302017-12-12T10:58:53+5:30

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला.

Immediate delete the illegal construction done in the parking lot, otherwise the cancellation of the building license: Municipal Commissioner Dhakne | पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा

पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवा अन्यथा बांधकाम परवाना रद्द करणार : मनपा आयुक्त ढाकणे यांचा इशारा

Next
ठळक मुद्देबेकायदा बांधकाम करणाºयांना नोटिसा देण्यात आल्या मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम उघडण्यात आलीमुदतीत बांधकाम काढून न घेण्याºयांचे बेकायदा बांधकाम महापालिकेचे पथक पाडून टाकेल


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १२  : पार्किंगमध्ये केलेले बेकायदा बांधकाम तातडीने हटवून खुले न केल्यास संबंधित इमारतीचा वापर परवाना किंवा प्रसंगी बांधकाम परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिला.
मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध मोहीम उघडण्यात आली आहे. प्रमुख रस्त्यांवरील इमारती तपासून पार्किंगमध्ये बेकायदा बांधकाम करणाºयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असल्याचे दिसून येत आहे. पण नोटिसा मिळाल्यानंतरही त्यांनी स्वत:हून बेकायदा बांधकाम काढून घेतलेले नाही. मुदतीत बांधकाम काढून न घेण्याºयांचे बेकायदा बांधकाम महापालिकेचे पथक पाडून टाकेल. पाडकामासाठी आलेला खर्च व संबंधित इमारतीला बांधकाम परवाना जेव्हा देण्यात आला त्या दिवसापासून दंड आकारण्यात येईल. आतापर्यंत मनपाच्या पथकाने ज्या इमारतीत पाडकाम केले त्या इमारतींना हा नियम लागू असल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी स्पष्ट केले. 
मनपातर्फे बेकायदा बांधकामाविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलण्यात आलेले असले तरी अशी बांधकामे असणाºयांना कोणतीच भीती असल्याचे दिसत नाही. त्यामुळे यापुढील पाहणीत पार्किंगचा बेकायदा वापर ज्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर झालेला आढळून येईल त्यांचा परवाना रद्द करून इमारतच पाडली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला.
------------------------
पार्क चौपाटीवरील अतिक्रमण तोडा
- पार्क चौपाटीवरील हातगाड्यांसाठी नव्याने नियोजन करण्यात येत आहे. जागेची मर्यादा व भाडे ठरवून स्थायी सभेकडे नव्याने प्रस्ताव मंजुरीला पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत येथील सर्व व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. असे असताना दररोज नव्याने गाड्या लागत आहेत. अतिक्रमण विभाग कारवाई करून गेल्यावर पुन्हा नव्या गाड्या येत आहेत. आता ज्या गाड्या लागतील त्या जेसीबीने तोडण्याचे आदेश आयुक्त डॉ. ढाकणे यांनी दिले. 
-----------------
४५ जणांना नोटिसा
पार्किंग व गोदामाच्या जागेत बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी मनपातर्फे आत्तापर्यंत ४५ जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नव्याने डॉ. शिरीष वळसंगकर, प्लॉट नं. १९७, मोदी, माधुरी शिवराम पापळ, प्लॉट नं. ८, मुरारजीपेठ, अजय अन्नलदास, २३, रविवारपेठ, अनिल रापेली, रविवारपेठ, बसवराज अक्कलकोटे, संतोष अक्कलकोटे, शारदाबाई अक्कलकोटे, रविवारपेठ, विजयकुमार राचर्ला, पाच्छापेठ, शोभा गायकवाड, रेल्वे लाईन, सलीम शेख, सिद्धेश्वरपेठ, अप्पासाहेब वांगी, नंदकुमार बुºहाणपुरे यांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. 

Web Title: Immediate delete the illegal construction done in the parking lot, otherwise the cancellation of the building license: Municipal Commissioner Dhakne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.