रिकाम्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमीची कामे तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:21 AM2021-05-23T04:21:51+5:302021-05-23T04:21:51+5:30
याबरोबरच शाळा खोल्यांची दुरुस्ती व नव्याने मंजूर झालेली बांधकामे सुरू करणे, दलित वस्तीतील कामे पूर्ण झाली आहेत व त्यावरील ...
याबरोबरच शाळा खोल्यांची दुरुस्ती व नव्याने मंजूर झालेली बांधकामे सुरू करणे, दलित वस्तीतील कामे पूर्ण झाली आहेत व त्यावरील संपूर्ण निधी खर्च झाल्याने समाधान व्यक्त करीत विविध विषयांवर माढा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी सभापती विक्रमसिंह शिंदे होते.
माढा पंचायत समितीची ऑनलाईन मासिक बैठक कोविड-१९ चे नियम पाळत घेण्यात आली. यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पंचायत समिती सदस्य शहाजी शिंदे, यशोदा ढवळे, सपना पाटोळे, सुजाता राऊत, साधना पाटील, उपअभियंता एस.जे. नाईकवाडी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, महावितरणचे सहायक अभियंता कानगुडे, सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल, कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बैठकीत प्रथम कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या पदाधिकारी, कर्मचारी व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर माढा तालुक्यातील सद्यस्थितीतला कोरोना विषयीचा आढावा घेण्यात आला. त्यात कोविड सेंटर,उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सेवा, सद्यस्थितीतली लसीकरण व्यवस्था, पदाधिकऱ्यांना लसीकरण प्राधान्याने व्हावे, बालविकास प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या सर्व बालकांना सध्या आहार वाटप करताना आधार कार्डची शक्ती करू नये, वृक्ष लागवड करणे यावर चर्चा करण्यात आली. व ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत शेवटी सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल यांनी आभार मानले.