बंदी असताना भाविकांकडून तलावात विसर्जन
By शीतलकुमार कांबळे | Published: September 28, 2023 06:33 PM2023-09-28T18:33:04+5:302023-09-28T18:35:50+5:30
काही भावीक दुसरा रस्ता शोधून तलावामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन विसर्जन करत आहे.
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे सकाळपासून विसर्जनाला सुरुवात झाली. यासाठी महापालिका, पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली. मात्र, काही भावीक दुसरा रस्ता शोधून तलावामध्ये श्री गणेश मूर्तीचे विसर्जन विसर्जन करत आहे.
छत्रपती संभाजी तलाव येथे महापालिकेतर्फे तीन ठिकाणी विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी तलावात विसर्जन न करता या विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पोलीस व महापालिकेचे कर्मचारी भाविकांना मार्गदर्शन करत आहेत मात्र काही भाविक पूल ओलांडून रेल्वे रुळाच्या बाजूने तसेच माजी सैनिक नगर येथून तलाव परिसरात जात आहेत. आपल्या गणेश मूर्तींची विसर्जन तलावामध्ये करत आहेत.
मागील दोन वर्षांमध्ये महापालिका व पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी तलावात विसर्जन होऊ नये म्हणून उपस्थित होते. मात्र यावर्षी त्या भागात पोलीस व महापालिका कर्मचारी नसल्यामुळे भाविक तलावामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करत आहेत.