जनजागृतीचा प्रभाव पडला भारी, कोरोनाबधितांचा आकडा आला आरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:48+5:302021-05-17T04:20:48+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावात भेट देऊन बैठक घेऊन कोरोनाबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना समिती ...
कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावात भेट देऊन बैठक घेऊन कोरोनाबाबत माहिती जाणून घेतली. कोरोना समिती व शिक्षकांना ॲक्टिव्ह करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गाईडलाईन दिल्या. त्या पद्धतीने सरपंच सज्जन लोंढे, ग्रामसेवक महेश खांडेकर, तलाठी प्रकाश भिंगारे, आशा वर्कर राऊत, उमेश गोरे, शिक्षक अर्जुन पवार, रामचंद्र बेलकर, भारत झांबरे, भंडारे, बंडू पवार, सिद्धेश्वर पवार यांनी जनजागृती गतिमान केली.
यामध्ये शिक्षकांनी ज्या कुटुंबातील व्यक्तींना लक्षणे असूनही ते तपासणी न करता खासगीत उपचार घेत आहेत, अशा नागरिकांना प्रबोधन करून तपासणी करण्यास भाग पाडले. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केल्यास कोरोना संसर्ग कसा रोखता येऊ शकतो, याबाबत मार्गदर्शन केले. यामुळे आज गावात केवळ १३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील पाच व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर ३ व्यक्ती कोविड सेंटर व पाच व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
प्रांताधिकाऱ्यांचा आधार, नागरिकांची साथ
प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी खेडभोसे गावाला दोनवेळा भेट देऊन बैठक घेत कोरोना समिती व इतर विभाग ॲक्टिव्ह करण्याची ठोस भूमिका घेतली. त्यास कोरोना समिती, इतर विभाग व ग्रामस्थांनी उत्तम साथ दिली. त्यामुळे आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवाय त्यांनी रुग्णांना रुग्णालयात बेड, मेडिकल औषधे उपलब्ध करून देण्यापर्यंत भूमिका पार पाडत आधार दिला. याला नागरिकांनीही साथ दिली असल्याचे माजी उपसरपंच सिद्धेश्वर पवार यांनी सांगितले.
कोट :::::::::::::
दुसऱ्या लाटेत खेडभोसेत कोरोनाबधितांची संख्या २०० पर्यंत गेली होती. परंतु, सर्वांच्या प्रयत्नाने आकडा कमी झाला असला तरी गावात लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालून जास्तीत जास्त लस उपलब्ध करून द्यावी.
- बंडू पवार
सदस्य, आपत्कालीन व्यवस्था समिती