तोत्के चक्रीवादळाचा सोलापूर जिल्ह्यात परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:55+5:302021-05-17T04:20:55+5:30
सोलापूर : तोत्के चक्रीवादळाचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यावरही झाला. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत ...
सोलापूर : तोत्के चक्रीवादळाचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यावरही झाला. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर वादळी वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे पडली.
तोत्के वादळाचा सोलापूर जिल्ह्याला धोका नसला तरी रविवारी जोराचा वारा व पावसाचे आगमन झाले. शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून जोरात वाऱ्याची सुरुवात झाली. रात्रभर अनेक ठिकाणी पाऊस पडत होता. रविवारी दिवसभर हवामान ढगाळ होते. अनेक ठिकाणी सरीही कोसळल्या. सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.
माढा तालुक्यात मोडनिंब व परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतातील मक्याची पिके आडवी झाली, तर शेतकऱ्यांच्या झाडाचे आंबे वादळी वाऱ्यामुळे खाली पडल्यामुळे मोठे नुकसान झाले. सांगोला तालुक्यात आंबा, डाळिंब, द्राक्ष आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यात चिकमहूद येथील सात शेतकऱ्यांच्या ६.३ हेक्टर क्षेत्रावरील टमाटा, केळी, डाळिंब फळ पिकांचे नुकसान झाले आहे.
--------
वादळामुळे आणखी दोन पावसाची शक्यता
तोत्के वादळामुळे दोन दिवस हवामानात बदल होणार आहे. या दोन दिवसांत जोराचा हवा आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सोलापुरात वादळाचा खूप कमी प्रमाणात परिणाम होणार असली तरी आणखी दोन दिवस जोराचा वारा व पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर हे वादळ पश्चिम महाराष्ट्रातून गुजरातकडे सरकणार असल्याचे विभागीय कृषी संशोधन केंद्रातर्फे सांगण्यात आले.