माफ केलेल्या परीक्षा शुल्काची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:11 AM2021-01-08T05:11:35+5:302021-01-08T05:11:35+5:30
कोरोनामुळे महाराष्ट्रात परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तरीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी ची मागणी ...
कोरोनामुळे महाराष्ट्रात परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तरीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी ची मागणी केली होती. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाविरोधात दोन आंदोलने केली. या आंदोलनास यश म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने १९.२६ टक्के इतके परीक्षा शुल्क माफ केले, पण त्याची अंमलबजावणी विद्यापीठांतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये झाली नाही. त्याची अंमलबजावणी करण्याबाबत करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय यांना निवेदन दिले.
यावेळी परिषदेचे जिल्हा संयोजक शुभम बंडगर, बारामती जिल्हा सहसंयोजक सौरभ शिंगाडे, करमाळा तालुका प्रमुख संतोष कांबळे, मानव फलफले, सागर लोखंडे, प्रशांत सोरटे, प्रदीप वाघमोडे, अजित पिसाळ, आशिष बंडगर, अक्षय थोरबोले व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो
०४करमाळा-निवेदन
ओळी
करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील यांना निवेदन देताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते.