सावळेश्वर टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी;  ट्रॅफिक जाममुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 10:31 AM2019-12-16T10:31:50+5:302019-12-16T10:35:58+5:30

वाहनांच्या रांगा, कर्णकर्कश आवाज अन् उडाला गोंधळ

Implementation of Fastag on Sawleshwar Tolanak; Traffic jams increased police headaches | सावळेश्वर टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी;  ट्रॅफिक जाममुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

सावळेश्वर टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी;  ट्रॅफिक जाममुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली

Next
ठळक मुद्देसोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोलनाक्यावर फास्टॅगची रविवारपासून अंमलबजावणी सुरूसर्व वाहनचालकांना फास्टॅग बसविण्याबाबत आवाहन केले, मात्र ३० टक्केच वाहनचालकांनी फास्टॅग बसविले

वडवळ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर नित्याप्रमाणेच भरधाव वेगाने वाहने येत होती, मात्र त्याठिकाणी आलेल्या वाहनांमुळे तीन रांगा फुल्ल झालेल्या़ मग येणारे वाहनचालक गर्दी पाहून सरळ फास्टॅगच्या रांगेत घुसत होते़मग काय तर तब्बल दोन-तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या़ वाहन पुढे सरकत नसल्याने पाठीमागील चालक हॉर्न वाजवित होते़ सर्वत्र कर्णकर्कश आवाज़़़ या सर्व प्रकारामुळे एकच गोंधळ उडाल्याचे चित्र सावळेश्वर टोलनाक्यावर रविवारी पाहावयास मिळाले़ मात्र यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली़ कारण रविवारपासून टोलनाक्यावर फास्टॅगच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला होता.

सावळेश्वर टोलनाक्यावर काही कर्मचारी १०० मीटर अंतरावर उभे राहिले, मात्र वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत होते़ पण वाहनांची संख्याच जास्त असल्याने गर्दी वाढतच गेली़ २ किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहनांच्या रांगा लागल्या़ अशातच वाहनचालक व टोलनाका कर्मचाºयांमध्ये वाद होत होते़ दरम्यान, वाहतूक पोलीस येऊन वाहने मार्गस्थ करीत आहेत.

१५ डिसेंबरपासून फास्टॅगची सुरू झाल्यामुळे त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे़ त्यामुळे वाहनांची गर्दी झाला़ त्यात एकमेकांच्या वाहनांची घासाघासी होत होती़ परिणामी वाहनचालकांमध्ये वाद होताना दिसून आले़ जसजशी रात्र होऊ लागली तशी वाहनांची गडबड दिसून आली़ आम्ही लांब अंतरावर थांबून फास्टॅग असलेले व नसलेले वाहन पाहून त्यांना योग्य रांगेत जाण्यासाठी सांगत होतो, मात्र वाहनचालकांशी बोलून बोलून व सारखे सांगूनही अडचणी वाढत असल्याचे टोलनाक्यावरील कर्मचारी प्रवीण मंडलिक, धनाजी भुसे यांनी सांगितले.

फास्टॅगची अंमलबजावणी सुरू
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोलनाक्यावर फास्टॅगची रविवारपासून अंमलबजावणी सुरू झाली़ मात्र अनेक जणांना याची माहिती नसल्याने महामार्गावरच लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची दमछाक झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर १५ डिसेंबरपासून फास्टॅगची अंमलबजावणी होणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते़ त्यानुसार सर्व वाहनचालकांना फास्टॅग बसविण्याबाबत आवाहन केले, मात्र ३० टक्केच वाहनचालकांनी फास्टॅग बसविले. प्रत्यक्ष टोलनाक्यावर १५ रोजी फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करताच वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाली़ परिणामी टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

पुण्याहून सोलापूरकडे निघालेले वैभव मोरे म्हणाले, फास्टॅगमुळे गर्दी होत असली तरी टोलनाक्यावरील सिस्टीम अत्याधुनिक होणे गरजेचे आहे.

सोलापूरहून पुण्याकडे निघालेले संजय कामठे म्हणाले, फास्टॅग ही चांगली सुविधा आहे, मात्र ही लवकरात लवकर सुरळीत होणे गरजेचे आहे अन्यथा वाहनचालकांचा वेळ व इंधन वाचण्याऐवजी तो खर्ची पडण्याची शक्यता आहे.

वरवडे टोलनाक्यावर आमचे सर्व कर्मचारी सज्ज आहेत़ आमची यंत्रणा अपुरी पडू नये म्हणून ग्रामीण पोलिसांचे एक पथक या ठिकाणी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले आहे़ ज्या वाहनचालकांनी अद्याप फास्टॅग बसवले नाही़, त्यांच्यासाठी बसवून देण्याची सोय व्हावी यासाठी तीन कंपन्यांचे प्रतिनिधी टोलनाक्यावर ठेवले आहेत़ फास्टॅग बसविण्यासाठी वाहनचालकांकडून एक रुपयाही आगाऊ रक्कम घेतली जात नाही़
- गजानन तुपे, व्यवस्थापक, वरवडे टोलनाका

१२ पैकी ६ लेन फास्टॅगसाठी
- या टोलनाक्यावर एकूण १२ लेन आहेत़ त्यापैकी एकूण ६ लेन या फास्टॅगसाठी ठेवण्यात आल्या आहेत़ मात्र सध्या बिगर फास्टॅगच्या वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याने फास्टॅगसाठी ४ लेन ठेवाव्यात, असे पंढरपूर येथील वाहनचालक समीर बागवान यांनी सांगितले़ ते म्हणाले, माझ्या वॉलेटमध्ये टोलनाक्यावर येण्यापूर्वी आवश्यक ती रक्कम टाकली, मात्र इथे आल्यानंतर फास्टॅग लेनमधून जाताना बॅलन्स कट झाला नाही़ त्यामुळे अर्धा तास थांबावे लागले़ आवश्यक ती रक्कम असतानाही हा मनस्ताप सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले़

वाहनचालकांना त्रास व्हावा, असा आमचा कोणताही हेतू नाही़ सर्व १२ लेनला आम्ही फास्टॅग सुविधा पुरवली आहे, मात्र सध्या ३० टक्के वाहनेच फास्टॅग वापरत आहेत़ याचा त्रास होत आहे़ सर्व वाहनचालकांनी आता फास्टॅग बसविल्याशिवाय पर्याय नाही़ ते बसविल्यास त्यांचा प्रवास वेळेत होईल़ यासाठी वाहनचालकांना सर्व मार्गदर्शन व सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे़
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Web Title: Implementation of Fastag on Sawleshwar Tolanak; Traffic jams increased police headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.