शहरातील पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी; जाणून घ्या..काेणत्या भागात हाेणार विस्कळीत
By राकेश कदम | Published: July 4, 2024 06:37 PM2024-07-04T18:37:20+5:302024-07-04T18:37:53+5:30
साेलापूर : शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी विस्कळीत हाेणार आहे. पाणी जपून वापरावे, असे आवाहन सार्वजनिक आराेग्य अभियंता व्यंकटेश चाैबे ...
साेलापूर : शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारी विस्कळीत हाेणार आहे. पाणी जपून वापरावे, असे आवाहन सार्वजनिक आराेग्य अभियंता व्यंकटेश चाैबे यांनी गुरुवारी सायंकाळी केले.
चाैबे म्हणाले, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी ते साेलापूर मेन लाइनला १३ मैलजवळ माेठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. ही गळती बंद करण्यासाठी गुरुवारी अचानक शटडाउन घेण्यात आले. या कारणास्तव गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत टाकळी पंपहाउसमधून पाणी उपसा हाेणार नाही. जुळे साेलापूर, साेरेगाव, भारती विद्यापीठ परिसर, नई जिंदगी या भागात शुक्रवारी उशीरा पाणी येणार आहे. काही भागातील पाणी पुरवठ्याचे राेटेशन एक दिवसांनी पुढे जाणार आहे. पाच दिवसांऐवजी सहा दिवसाआड पाणी पुरवठा हाेणार आहे. दुरुस्तीचे काम शुक्रवारी दुपारपर्यंत पूर्ण हाेण्याची शक्यता आहे. दुरुस्ती पूर्ण झाली की टाकळी याेजनेतून पुन्हा पाणी पुरवठा सुरू हाेईल. परंतु, या दरम्यान, शहराच्या पाणी पुरवठ्याचे राेटेशन एक दिवसांनी पुढे जात असल्याचे चाैबे यांनी सांगितले.