कर्नाटकात बी फॉर्मसीला प्रवेश देतो म्हणत चौघांना पावणेदोन लाखाला गंडवले, तोतयाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Published: April 6, 2024 06:41 PM2024-04-06T18:41:10+5:302024-04-06T18:41:36+5:30
या प्रकरणी सागर राजशेखर हिरेहब्बू (वयत- ३४, रा. ६३४ उत्तर कसबा, बाळीवेस, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यासोबत अन्य चौघेजण या फसवणुकीला बळी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोलापूर : कर्नाटकातील बीदर येथे बी फॉर्मसीला प्रवेश मिळवून देतो म्हणून सोलापुरातील चौघा तरुणांकडून यूपीआयद्वारे १ लाख ८० हजार रुपये घेऊन त्यांना गडंवल्याचा प्रकार उघकीस आला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. बाळीवेसेतील उत्तर कसबा परिसरात ५ ऑक्टोबर ते २४ जून २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. तुषार सिद्राम हिप्परगे (रा. बार्शी) असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सागर राजशेखर हिरेहब्बू (वयत- ३४, रा. ६३४ उत्तर कसबा, बाळीवेस, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्यासोबत अन्य चौघेजण या फसवणुकीला बळी पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी व नमूद आरोपीची यांची ओळख असून, आरोपीने फिर्यादीला बीदर येथे बी फॉर्मसीला प्रवेश मिळवून देतो म्हणून वेळोवेळी फिर्यादीच्या एस बी आय शाखा बाळीवेस येथील ३१७३८६२७३१९ या बँक खात्यावरुन गूगल प, फोन पे द्वारे वेळोवेळी ऑनलाईन रक्कम स्वीकारली. याशिवाय फिर्यादीचे मित्र मल्लिकार्जुन येनपे आणि अप्पू नावडे या दोघांनीही प्रत्येक ६० हजार रुपये आरोपीच्या खात्यावर ऑनलाईन जमा केले. फिर्यादीचा मेव्हणा संकेल बाभुळगावकर याला गॅप सर्टिफिकेट काढून सोलापूर विद्यापीठ येथे प्रवेश मिळवून देतो म्हणून १० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले.
चौघांकडून एकूण १ लाख ८० हजार रुपये घेऊनही काम न करता आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ४२० अन्वये गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास महिला फौजदार जेऊघाले करीत आहेत.