निरा खोऱ्यात चारही धरणात २० टक्के पाणी पातळी वाढली
By काशिनाथ वाघमारे | Published: July 25, 2023 09:06 PM2023-07-25T21:06:44+5:302023-07-25T21:06:53+5:30
सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी ...
सोलापूर : निरा खो-यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे वीर,भाटघर,निरा- देवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीपातळी २० टक्क्यांनी (१० दलघमी) वाढली आहे. असाच पावसाची परिस्थिती राहिल्यास लवकरच चारही धरणे १०० टक्के भरतील.
मागील गुरुवारी निरा खोऱ्यातील वीर,भटघर,निरा-देवघर व गुंजवणी ही ४ धरणे पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पावसामुळे ४० टक्केच (१९ दलघमी) भरली होती. त्यानंतर गेली दोन दिवसापासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर धरल्याने पाणी साठा ६० टक्के (२९ दलघमी) इतका झाला आहे. सध्या वीर धरणातून पिण्याच्या पाण्याचे नियोजन असून धरणाच्या पाणीपातळीत वाढीमुळे सिंचनाच्या पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. गतवर्षी चार धरणात ७४.७० टक्के पाणीसाठा होता.
चारही धरणातील पाणीपातळी
वीर धरण : ५९.६२ टक्के.
भाटघर धरण : ५५.९१ टक्के.
निरा-देवघर : ६९.७५ टक्के.
गुंजवणी : ५९.३७ टक्के