दूध दरवाढीसाठी केममध्ये गायिलाच केला दुग्धाभिषेक
By दिपक दुपारगुडे | Published: December 9, 2023 05:23 PM2023-12-09T17:23:43+5:302023-12-09T17:23:56+5:30
गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशींच्या दुधाला ७० रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली.
सोलापूर : गायीच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशींच्या दुधाला ७० रुपये दर द्या... अशा घोषणा देत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख हरी तळेकर आणि कार्यकर्त्यांनी गाईला दुग्धाभिषेक केला.दुष्काळ जन्य परिस्थिती आणि दूध उत्पादनावर होणारा खर्च प्रति लिटर दुधाला मिळणारा दर याचे गणित जुळविताना शेतक-यांचा दुध व्यवसाय अडचणीत आला आहे. गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशींच्या दुधाला ७० रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कृष्णाई दूध डेअरीचे चेअरमन कालीदास तळेकर, कुंडलिक देवकर, हनुमंत देवकर, ज्ञानेश्वर देवकर, सुरेश देवकर, गणेश देवकर, दिनकर सुरवसे, विष्णू यादव, राजेंद्र देवकर, दादा सातव, मधुकर यादव संभाजी गुरव, दादा पळसकर, विठ्ठल पळसकर, महादेव पळसकर, हनुमंत पळसकर चेतन साखरे, सुभाष पळसकर जोतिराम पळसकर, सचिन बिचितकर, रेवणनाथ बिचितकर, बाळासाहेब अवघडे, राजेंद्र कांबळे, भाऊसाहेब गुटाळ, समाधान चव्हाण, नागेश देवकर, अजितदादा तळेकर, नागनाथ तळेकर, समीर दादा तळेकर,सतीष खानट, मच्छिंद्र राउत, उत्तरेश्वर गोडगे, आवीनाश तळेकर, मनोज तळेकर, भैरू म्हेत्रे, हरिभाऊ तळेकर, अक्षय भोसले, हरिदास तळेकर, अक्षय तळेकर, उत्तरेश्वर तळेकर, मामा देवकर, नवनाथ देवकर, शिवाजी मोरे,लवळे, अनंता तळेकर, नितीन तळेकर, चव्हाण, शिवाजी तळेकर बाळासाहेब अवघडे उपस्थित होते.