दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी सिटूचे आंदोलन; अधिष्ठातांना दिलं निवेदन

By रूपेश हेळवे | Published: October 20, 2023 04:08 PM2023-10-20T16:08:57+5:302023-10-20T16:09:03+5:30

ऑनलाइन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देताना पूर्वीची प्रमाणपत्रावरील टक्केवारी कायम ठेवण्यासाठी सिटूच्या वतीने आंदोलन, अधिष्ठातांना निवेदन

In situ agitation for various demands of the disabled; A statement was given to the authorities | दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी सिटूचे आंदोलन; अधिष्ठातांना दिलं निवेदन

दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी सिटूचे आंदोलन; अधिष्ठातांना दिलं निवेदन

सोलापूर : दिव्यांग बांधवांना ऑनलाइन दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देत असताना त्यांना पूर्वी दिलेल्या प्रमाणपत्रावरील टक्केवारी कायम ठेवावी. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देत असताना होणारी प्रक्रिया सहज सुलभ आणि एकाच वेळी व्हावी व त्यांना लवकरात लवकर प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांसाठी लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्यावतीने शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी डॉ. वैंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

सिटूचे राज्य सचिव युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आपल्या स्तरावर योग्य ते निर्णय घेऊन अन्य धोरणात्मक बाबींसाठी शासनाकडे शिफारस करणार असल्याची हमी सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

Web Title: In situ agitation for various demands of the disabled; A statement was given to the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.