'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

By रवींद्र देशमुख | Published: July 18, 2024 05:30 PM2024-07-18T17:30:20+5:302024-07-18T17:31:29+5:30

आषाढी यात्रेचा सोहळ्यानिमित्त नवमी दिवशी भाविकांनी पंढरपूर गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल झाले होते.

in solapur after having blessings of lord vitthal in ashadhi ekadashi the devotees went back | 'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

रवींद्र देशमुख,सोलापूर/पंढरपूर :  आषाढी यात्रेच्या एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या लाखो भाविकांनी आम्ही जातो आमच्या गावा आमचा निरोप घ्यावा असे म्हणत जड अंःकरणाने विठ्ठलाचा निरोप घेतला.

आषाढी यात्रेचा सोहळ्यानिमित्त नवमी दिवशी भाविकांनी पंढरपूर गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल झाले होते. पंढरपुरातील श्री संत कैकाडी महाराज मठ, श्री गजानन महाराज मठ, श्री संत तनपुरे महाराज मठ, त्याचबरोबर शहरातील विविध मठ, लॉज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास या ठिकाणी भाविकांनी मुक्काम केला होता.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनासाठी पत्राशेड ओलांडून गोपाळपूर येथील लिंगायत स्मशानभूमी पर्यंत दर्शन गेली होती. चंद्रभागेच्या पवित्र स्नान करून भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत होते. शहरातील वाढलेली गर्दी चा आंदाजात इतर जिल्ह्यातून आलेल्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर दुकाने थाठली होती. त्यामुळे रस्त्यावर अधिकच गर्दी झाली होती. आषाढी यात्रेचा एकादशी सोहळ्यानंतर अनेक भाविक जमले तर विठ्ठलाचे दर्शन घेत होते. अन्यथा मंदिराला प्रदक्षिणा मारून विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन खाजगी वाहनाने, एस्टी बस व रेल्वेने आपल्या गावी परतत होते. यामुळे शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली. तसेच रेल्वे स्टेशन व बस स्थानकावर देखील गर्दी झाली होती. 

शहरातून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या वाहनांची संख्या अधिक होती. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी प्रत्येक चौकात चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली नाही. व भाविकांना रस्त्यावर तासंतास उभे राहावे लागले नाही.

Web Title: in solapur after having blessings of lord vitthal in ashadhi ekadashi the devotees went back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.