Solapur: भाजप कार्यकर्त्यांचे काँग्रेस खासदार साहूंविरोधात आंदोलन, पोस्टरचे दहन, रस्त्यावर घोषणाबाजी
By राकेश कदम | Updated: December 11, 2023 13:07 IST2023-12-11T13:06:40+5:302023-12-11T13:07:07+5:30
Solapur: काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या विरोधात सोलापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विजापूर रोडवरील महापालिकेच्या बागेजवळ साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 'काँग्रेस खासदार हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या.

Solapur: भाजप कार्यकर्त्यांचे काँग्रेस खासदार साहूंविरोधात आंदोलन, पोस्टरचे दहन, रस्त्यावर घोषणाबाजी
- राकेश कदम
सोलापूर - काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या विरोधात सोलापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विजापूर रोडवरील महापालिकेच्या बागेजवळ साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 'काँग्रेस खासदार हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या.
काँग्रेसचे खासदार धीरसाहू यांच्याकडे तीनशे कोटीहून अधिकची रोकड सापडली आहे. भाजपने साहू यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करावे असे आदेश दिले आहेत. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अर्चना वडनाल, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सोमवारी दुपारी १२च्या सुमाराला विजापूर रोड परिसरात काँग्रेस नेते आणि खासदार साहूंच्या विरोधात निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी साहू यांचे छायाचित्र असलेले पोस्टर आणले होते. या पोस्टरचे दहन करण्यात आले. या आंदोलनात शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, रोहिणी तडवळकर, लक्ष्मी नडगिरी, संपदा जोशी, श्वेता व्हनमाने, अनुराधा खारे, नीलिमा शितोळे, आनंद बिराजदार, अर्जुन जाधव, महेश देवकर, दत्ता नडगिरी, हेमंत पिंगळे, श्रीनिवास बुरुडकर, मधुसूदन जंगम आदी सहभागी झाले होते.