संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

By काशिनाथ वाघमारे | Published: October 15, 2023 04:41 PM2023-10-15T16:41:24+5:302023-10-15T16:42:37+5:30

गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला.

In Solapur, Ghatasthapna took place in front of five goddesses | संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

संबळाच्या तालावर 'आई राजा उदो उदो'चा गजर; सोलापुरात प्रमुख पाच देवींपुढे झाली घटस्थापना

सोलापूर : संबळ आणि झांजच्या तालावर जमलेल्या भक्तगण, पुजारी, मानक-यांनी 'आई राजा उदो उदो'चा गजर करीत सोलापुरात ग्रामदेवी रुपाभवानीसह प्रमुख पाच देवींपुढे घटस्थापना झाली. याशिवाय काही प्रमुख मंडळांनी मंदिराच्या आवारात रविवारी पालखी मिरवणूक काढून देवी प्रतिष्ठापना केली.
ग्रामदेवी रुपाभवानी मंदिरात पहाटे चार वाजता प्रक्षाळपूजा झाली. सकाळी ११.३० वाजता ट्रस्टी वहिवाटदार मल्लिनाथ मसरे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थित देवीची आरती करुन घटस्थापना करण्यात आली.

याबरोबरच गणेशपेठेतील भावसार समाजाची कुलस्वामिनी हिंगुलांबिका देवी मंदिरात हिंदु धर्म रुढी परंपरेने पहाटे पाच वाजता गाभा-यात दरवाजा उघडण्यात आला. सहा वाजेपर्यंत मंत्रपुष्पांजलीने अंबादास शामराव सुलाखे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आले. वस्त्र परिधान करून सुवर्ण अलंकार, पुष्पहार अर्पण करून भाविकांना दर्शनासाठी दरवाजा उघडला, सकाळी आकरा ते एक वाजेपर्यंत विविध धार्मिक विधीने मंदार रेळेकर यांच्या हस्ते परिवारासह जय हिंगलाज मातेच्या जय घोषात घटस्थापना करून आरती करण्यात आली.

रविवार पेठेतील इंद्रभवानी देवी मंदिरातही संबळ अन झांज पथकाच्या गजरात महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. पहिल्या दिवसी देवीला तुळजाभवानी देवीच्या रुपात सजवले गेले. यावेळी लक्ष्मण गायकवाड, नागनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड, ब्रम्हदेव गायकवाड, इंद्रजित गायकवाड या प्रमुखांची उपस्थिती होती. तसेच शिवलाड तेली समाजाच्या अंबाबाई आणि जगदंबा या दोन देवीच्या गाभा-यात घटस्थापना झाली. अंबाबाई ट्रस्टच्या वतीने प्रवीणचंद्र उळागड्डे यांच्या हस्ते घटस्थापना झाली. याबरोबरच सायंकाळी चार वाजल्यानंतर देवी प्रतिष्ठापनेसाठी काही प्रमुख मंडळाच्या मिरवणुका वाजत-गाजत निघाल्या.

Web Title: In Solapur, Ghatasthapna took place in front of five goddesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.