सोलापुरात येत्या पंधरवड्यात मोर्चा, सभा, आंदोलनास बंदी अन्यथा कारवाई
By शीतलकुमार कांबळे | Published: November 4, 2023 05:57 PM2023-11-04T17:57:13+5:302023-11-04T17:58:39+5:30
सोलापूर : शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात ...
सोलापूर : शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात आली आहे. यासाठी कलम ३७ (१)चा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे यांनी जारी केला असून, प्रतिबंध करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हा आदेश ५ ते १९ नोव्हेंबर या कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतीही शस्त्रे बाळगू नयेत, ज्वालागृही पदार्थाची वाहतूक करु नये, मोर्चा, निदर्शने, आंदोलनासारख्या बाबींची प्रदर्शन करु नये, विविध समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करु नये असे आदेशात म्हटले आहे.
तसेच या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये. हा आदेश लग्न, अंत्ययात्रा, मोर्चा, रॅली, आंदोलने, निवेदने, धरणे, सभा पूर्वपरवानगी घेऊन केले असल्यास त्यांना लागू होणार नाही.