सोलापुरात सकल मराठा समाजाने बंद पाडला 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:27 PM2022-11-07T16:27:59+5:302022-11-07T16:29:17+5:30
येथील सकल मराठा समाज संघटनेने 'हर हर महादेव' या बहुचर्चित चित्रपटाचा सोमवारी दुपारचा शो रद्द करायला लावला. यापुढील काळातही चित्रपटाचा शो लावणार नाही, अशी ग्वाही चित्रपटगृह मालकाने दिली.
राकेश कदम
सोलापूर : येथील सकल मराठा समाज संघटनेने 'हर हर महादेव' या बहुचर्चित चित्रपटाचा सोमवारी दुपारचा शो रद्द करायला लावला. यापुढील काळातही चित्रपटाचा शो लावणार नाही, अशी ग्वाही चित्रपटगृह मालकाने दिली.
सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार म्हणाले, हर हर महादेव चित्रपटात इतिहासाचा विपर्यास झाला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल गैरसमज निर्माण होईल अशी दृश्य दाखवण्यात आली आहेत. ई-स्क्वेअर सिनेमागृहाच्या मालकाला चित्रपटाचा शो रद्द करण्यास सांगितले. त्यांनीही आमची विनंती मान्य केली. या पुढील काळात या चित्रपटाचा शो दाखविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. त्यामुळे मालकाने शो करणार नाही असे सांगितले.
यावेळी सकल मराठा समाजाचे राजन जाधव, गणेश डोंगरे, शाम गांगर्डे, मंगेश जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.