सोलापुरात यंदा गोमय लाकडांनं पेटली होळी
By विलास जळकोटकर | Published: March 7, 2023 06:55 PM2023-03-07T18:55:17+5:302023-03-07T18:55:56+5:30
वृक्षतोडीला फाटा : ११ गोशाळेत तयार झाल्या लाखभर गोवऱ्या
विलास जळकोटकर, सोलापूर : होळीच्या पारंपरिक सणाला होळी पेटवण्यासाठी वापर मोठ्या प्रमाणात लाकडांनी व्हायचा, यंदा सोलापूरकरांनी त्याला फाटा देत गोवऱ्या, गोवऱ्यांपासून तयार केलेल्या लाकडांचा, नारळांच्या फांद्या, झुडपांचा वापर करुन पर्यावरण पूरक होळी अनेकांनी प्राधान्य दिले. या निमित्ताने बेसुमार होणाऱ्या वृक्षतोडीलाही आळा बसला. यासाठी शहरातील ११ गोशाळांमधून जवळपास लाखभर गोवऱ्या बनवण्यात आल्या.
जुळे सोलापुरातील विशालनगर गणेशोत्सव मंडळानेही यंदा तरुणाई आणि शाळकऱ्यांच्या साथीने नारळाच्या फांद्या आणि गोमय लाकडांना प्राधान्य दिले. यासाठी मंडळाच्या उत्साही तरुणाईनं १२१ नग नारळाच्या फांदया व ३० किलो गोमय लाकडे वापरुन वृक्षतोड न करता मोठ्या उस्तहत् होळीचा सन साजरा केला, तसेच् होळीच्या पूजेवेळी पारंपरिक वाद्य हलगी, ढोल, ताशाचा वापर केला. या उत्सवासाठी विशालनगरमधील महिलांनीही उत्स्फूर्त हजेरी लावली.
गाईच्या शेणा पासून गोमय लाकडे तयार करणे, ही संकल्पना सोलापुरात नवीन आहे. या गोमय लाकडांचा प्रथमच यंदाच्या वर्षी वापर करण्यात आला. या उपक्रमासाठी वीरेंद्र खेडगीकर, विरेश खेडगीकर, विपुल बिराजदार, युवराज गावडे, अथर्व शेंडे, सनय वाघचवरे, अथर्व वैद्य, वेदांत पाटील, अरव हत्ते, अंकुर येलीकर, निनाद पाटील, शैलेश जाधव, मयूर पानकर यांनी परिश्रम घेतले.
गोशाळेतल्या गोवऱ्यांचा वापर
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील हिप्परग्याच्या तेजोम्रत गोशाळेचे संचालक देविदास मिटकरी यांनी गोमय लाकूड तयार करण्याचा नवा प्रयोग यंदा केला. गायीच्या शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या लाकडाने यंदा शहरात विविध ठिकाणी होळी पेटवण्यात आली. यासाठी एका लाकडाची किंमत साधारणता दहा रुपये ठेवली. त्याची रुंदी तीन इंच आणि लांबी दोन फूट अशी होती. तसेच शहरातील ११ गोशाळांमधून तयार केलेल्या जवळपास लाखभर गोवऱ्यांचा यंदाच्या होळीत वापर करण्यात आला.
वृक्षतोडीवर पर्याय
वृक्षतोडीवर पर्याय म्हणून शेणापासून तयार केलेल्या लाकडांना अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या लाकडांपासून कोणत्याही प्रकारचे वायू प्रदूषण होणार नसून उलट याचा सुगंध संपूर्ण वातावरणात प्रसन्न करणारा आणि शरीराला उपाय कारक असल्याचे मिटकरी यांचे म्हणणे आहे. सेना पासून तयार केलेल्या साधारण तीन इंच आणि दोन फूट अशा लांबीच्या लाकडाची एक काठी साधारण एका किलोची होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"