दोन दुचाकींची समोरासमाेर धडक; तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
By रूपेश हेळवे | Updated: March 23, 2023 15:49 IST2023-03-23T15:49:04+5:302023-03-23T15:49:16+5:30
डॉक्टरांनी राजकुमार गंदले यांना मृत घोषित केले. तर कोळी याच्यावर उपचार सुरू आहेत

दोन दुचाकींची समोरासमाेर धडक; तरूण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मुंढेवाडी जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरून तरुण गंभीर जखमी झाला आहे. राजकुमार शरणप्पा गंदले ( वय ४०, रा. मुंढेवाडी, ता. अक्कलकोट) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
गुरूवारी सकाळी मृत राजकुमार हे आपल्या दुचाकीवरून मुंढेवाडी ते तडवळकडे दुचाकीवरून जात होते. तेव्हाच मुंढेवाडी पासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावर सचिन शिवानंद कोळी ( वय २५, रा. मुंढेवाडी, अक्कलकोट) हा तडवळ ते मुंढेवाडीकडे दुचाकीवरून येत होता. त्यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या गंभीर अपघातात राजकुमार हे जागेवरच रक्तबंबाळ अवस्थेत बेशुध्द पडले. तर कोळी हा गंभीर जखमी झाला. त्या दोघांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी राजकुमार गंदले यांना मृत घोषित केले. तर कोळी याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.