जिल्ह्यात ९३ टक्के 'आनंदाचा शिधा', शहर सहाव्या, जिल्हा आठव्या नंबरवर
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 25, 2023 03:53 PM2023-11-25T15:53:13+5:302023-11-25T15:53:36+5:30
शहरातील एक लाख १७ हजार १०० शिधापत्रिका धारकांपैकी १ लाख ९ हजार ४५६ लाभार्थींनी दिवाळीत आनंदाचा शिधा घेतला.
सोलापूर : आनंदाचा शिधा वाटप करुन सोलापूर शहर विभागाने राज्यात सहावा क्रमांक तर जिल्हा पुरवठा विभागाने राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. दोन्ही पुरवठा विभागाकडून सरासरी ९३ टक्के शिधा वाटप झाल्याची माहिती शहर पुरवठा अधिकारी सुमित शिंदे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सरडे यांनी दिली.
शहरातील एक लाख १७ हजार १०० शिधापत्रिका धारकांपैकी १ लाख ९ हजार ४५६ लाभार्थींनी दिवाळीत आनंदाचा शिधा घेतला. जिल्हा पुरवठा विभागाकडे असलेल्या ३ लाख ८० हजार १८० शिधापत्रिका धारकांपैकी जवळपास ३ लाख ५४ हजार ८८० लाभार्थींनी आनंदाचा शिधा घेतला. जिल्हा पुरवठा विभागाने ९३. ३५ टक्के तर शहर पुरवठा विभागाने ९३.४७ टक्के आनंदाचा शिधा वाटला. साताऱ्यात ९८ टक्के आनंदाचा शिधा वाटप झाला असून राज्यात सातारा जिल्हा एक नंबरवर आहे.