आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम यांनी प्रवाशांशी संवाद साधत कुर्डुवाडी - मिरज सेक्शनमध्ये केली पहाणी

By रूपेश हेळवे | Published: June 8, 2024 06:57 PM2024-06-08T18:57:55+5:302024-06-08T18:58:34+5:30

यानंतर त्यांनी शिवाय मोडनिंब रेल्वे स्थानक परिसरातील नवीन प्रस्तावित असलेले गती शक्ती कार्गो टर्मिनलची पाहणी केली.

In the wake of Ashadhi, DRM interacted with passengers and inspected the Kurduwadi - Miraj section. | आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम यांनी प्रवाशांशी संवाद साधत कुर्डुवाडी - मिरज सेक्शनमध्ये केली पहाणी

आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम यांनी प्रवाशांशी संवाद साधत कुर्डुवाडी - मिरज सेक्शनमध्ये केली पहाणी

सोलापूर : आषाढीच्या पार्श्वभूमीवर डीआरएम नीरज कुमार दोहरे यांनी शनिवारी कुर्डुवाडी - मिरज सेक्शनचे निरीक्षण केले. याची सुरूवात कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून करण्यात आली. त्यांनी स्थानकावरील प्रवाशांशी संवाद साधत तेथील समस्या जाणून घेतल्या. शिवाय अधिकार्यांना स्वच्छता आणि आषाढी पंढरपूर यात्रे संबंधी तयारीच्या सूचना दिल्या. शिवाय कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावरील तयारीचा आढावा घेतला.

यानंतर त्यांनी शिवाय मोडनिंब रेल्वे स्थानक परिसरातील नवीन प्रस्तावित असलेले गती शक्ती कार्गो टर्मिनलची पाहणी केली. भविष्यात रॅक क्षमता वाढविण्यासाठी सायडिंगचा विस्तार, करण्यासंबधित जागेची पाहणी केली. अरग रेल्वे स्थानका वरील गुड्स शेडची पाहणी केली. त्यात काम करीत असलेल्या माथाडी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या, गुड्स शेड मधील स्वच्छतागृहाची पाहणी केली.

यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे एन गुप्ता, विभागीय अभियंता रवींद्र सिंगल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अभिषेक चौधरी, विभागीय सुरक्षा आयुक्त या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समावेत अन्य रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: In the wake of Ashadhi, DRM interacted with passengers and inspected the Kurduwadi - Miraj section.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.