दोन वर्षात २७३६ तरुणांनी सोलापुरात खोललंय रेस्टाँरंट

By काशिनाथ वाघमारे | Published: April 3, 2023 04:32 PM2023-04-03T16:32:29+5:302023-04-03T16:33:04+5:30

सोलापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशभरातील उद्योग आणि खासगी क्षेत्रातल्या नाेक-यावर विपरीत परिणाम झाला. यातून सावरायला दोन वर्षानंतरचा कालावधी गेला. ...

In two years, 2736 youths have opened restaurants in Solapur | दोन वर्षात २७३६ तरुणांनी सोलापुरात खोललंय रेस्टाँरंट

दोन वर्षात २७३६ तरुणांनी सोलापुरात खोललंय रेस्टाँरंट

googlenewsNext

सोलापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशभरातील उद्योग आणि खासगी क्षेत्रातल्या नाेक-यावर विपरीत परिणाम झाला. यातून सावरायला दोन वर्षानंतरचा कालावधी गेला. काही तरुणांनी हॉटेलकम रेस्टॉरंट संकल्पनेकडे वळाले. आर्थिक अडचणी, वीज, पाणीसह जागेच्या अनेक समस्यांना तोंड देत ही संकल्पना उतरवताना काही तोट्यांचाही सामना करावा लागला आहे. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यात दोन वर्षात कोरोनानंतर २७३६ तरुणांनी व्यवसाय सुरू केला असून त्याला आता कुठं बळ मिळालय.

सोलापूर शहरात जवळपास ३७५ हून मोठे हॉटेल्स आणि लॉजेस आहेत. काही दिवसांपूर्वी या मोठ्या हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये १२५ हून अधिक भर पडली आहे तर रेस्टॉरंटच्या संख्येतही हॉटेल व्यवसायिकांच्या मते २५० नव्या व्यवसायिकांची भर पडली आहे. सध्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची जीएसटी १२ टक्केवर पोहोचली असताना ही तरुणाई या व्यवसायात आता तग धरुन राहण्यासाठी अनेक कल्पना मांडत आहे. सण-उत्सवाच्या दिवसी चांगले घरगुती पदार्थ ऑनलाईन पद्धतीनेही सेवा देताहेत. आता जुळे सोलापूर, हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड, पुणे रोड आणि विजापूर रोडसह होटगी रोडवरही हॉटेल रेस्टॉरंटची संख्या नव्याने पाहायला मिळतेय.

अन्न व औषध प्रशासनाकडे २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षात हॉटेल-रेस्टॉरंटसाठी ऑनलाईन अर्ज मोठ्या प्रमाणात आले. या काळात २७३६ तरुणांना या व्यवसायाचा परवाना द्यावा लागला आहे. सोलापूरसारख्या ग्रामीण भागातही हॉटेलिंगला चालना मिळतेय. 
- प्रदीपकुमार राऊत
सहायक आयुक्त अन्न व औषध

हाॅटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन असोसिएशन वेस्टन इंडिया (एचआरए डब्ल्यु आय) यांच्यामुळे नव्या हाॅटेलिंगला आणि रेस्टॉरंटला चालना मिळत आहे. काेरोनानंतर या व्यवसायाला पोषक वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आज सोलापूर शहरात ३० हून अधिक तरुण मागील काही दिवसात रेस्टाँरंट कम हॉटेल व्यवसायाकडे वळालेली आहे.
- अनिल चव्हाण
माजी अध्यक्ष, सोलापूर हॉटेल असोसिएशन

Web Title: In two years, 2736 youths have opened restaurants in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.