पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:09 PM2018-01-17T17:09:37+5:302018-01-17T17:12:09+5:30
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि १७ : केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४ जानेवारी २०१८ पासून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ हे अभियान सुरु केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरे स्वच्छ व सुंदर व्हावीत, या हेतूने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी पंढरपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ. प्रशांत परिचारक यांनी केले.
पंढरपूर नगरपरिषद व बँक आॅफ इंडिया यांच्या वतीने शहरातील नागरिकांना १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना नागेश भोसले होत्या. यावेळी नगरसेवक दगडू धोत्रे, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, बँक आॅफ इंडियाचे मुख्य प्रबंधक तितरे व माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित होते.
संपूर्ण देशात प्लास्टिक कचºयाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरामध्ये निर्माण होणारा कचरा व या कचºयाचे विलगीकरण करुन या कचºयावर प्रक्रिया करुन खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर स्वच्छ राहावे, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे या हेतूने पंढरपूर शहरातील नागरिकांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी शहरातील व्यापारी, व्यावसायिक, रहिवासी, भाविक, मठ व मंगल कार्यालय, इतर नागरिकांनी आपल्या घरामध्ये अथवा व्यवसायाच्या ठिकाणी ओला व सुका कचºयासाठी दोन स्वतंत्र डबे ठेवावेत, नगरपरिषदेने कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आपल्या दारापर्यंत उपलब्ध करुन दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
हे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, आरोग्याधिकारी डॉ. संग्राम गायकवाड, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, बर्मा पवार, मारुती मोरे, कुमार भोपळे हे प्रयत्नशील आहेत.
यावेळी माजी नगराध्यक्ष सतीश मुळे, लक्ष्मण शिरसट, नगरसेविका सुप्रिया डांगे, वामनराव बंदपट्टे, संजय निंबाळकर, विशाल मलपे, विक्रम शिरसट, विवेक परदेशी, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, सुजितकुमार सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते सचिन डांगे, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, नितीन शेळके, धर्मराज घोडके हे उपस्थित होते.