बार्शीत लायन्स क्लबचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:16 AM2021-07-15T04:16:46+5:302021-07-15T04:16:46+5:30
बार्शी : लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन व लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन तेजस्विनीचे नूतन अध्यक्ष, पदाधिकारी व त्यांच्या ...
बार्शी : लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन व लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन तेजस्विनीचे नूतन अध्यक्ष, पदाधिकारी व त्यांच्या संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ आणि लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनचा शुभारंभ पार पडला.
बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी अजित देशमुख, सचिव रवी राऊत तर खजिनदार म्हणून प्रीतम सुरवसे आणि तेजस्विनीच्या अध्यक्षपदी शर्वरी फुरडे,सचिव पल्लवी बजाज आणि खजिनदार म्हणून प्रांजली कुलकर्णी यांना तर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या युवकांच्या लिओ क्लबच्या अध्यक्षपदी पवन श्रीश्रीमाळ, सचिव आदित्य सोनिग्रा तर खजिनदार म्हणून अक्षित परमार यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, रिजन चेअरमन आझम शेख, उपविभागीय सभापती आनंद पुनमिया उपस्थित होते. माजी प्रांतपाल उदय लोध व विजयकुमार राठी यांनी शपथ प्रदान अधिकारी म्हणून काम पाहिले.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की,बार्शीच्या सामाजिक जडणघडणीमध्ये लायन्स क्लब टाऊनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोरोनामुळे यंदा कृषी प्रदर्शनात खंड पडला असला तरी कोरोना कमी होताच पुन्हा प्रदर्शन घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. लिओ क्लबच्या माध्यमातून तरुणांनाही सामाजिक कार्यात आणण्याचे कामही आता हाती घेतले आहे हे कौतुकास्पद आहे.
सूत्रसंचालन वैभवी बुडूख आणि अर्चना आवटे यांनी केले. आभार रवी राऊत यांनी मानले.
-------
फोटो : १३ बार्शी लायन्स क्लब
बार्शीतील लायन्स क्लबच्या वतीने शर्वरी फुरडे आणि अजित देशमुख यांना पदाची शपथ देताना उदय लोध व विजयकुमार राठी.