गजानन रत्नपारखी ज्वेलर्सच्या दागिने महोत्सवाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:50+5:302021-01-08T05:12:50+5:30
मंगळवेढा : गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने आयाेजित केेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन संगीता जोतीराम ...
मंगळवेढा : गजानन रामचंद्र रत्नपारखी ज्वेलर्सच्या वतीने आयाेजित केेलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्घाटन संगीता जोतीराम गुंजवटे यांच्या हस्ते झाले. ठुशी-नथ, राशीरत्न दागिने हे या प्रदर्शनाचे विशेषत्व ठरले असून २० जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
गुरुवारी सकाळी तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या पत्नी पूजा रावडे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या पत्नी प्रचंडराव, अश्विनी आलदर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला सुरुवात झाली.
रत्नपारखी ज्वेलर्सने वैविध्यपूर्ण दागिन्यांनी जिल्ह्यातील ग्राहकांशी नाते जोडले आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकानांमध्ये जे दागिने मिळतात ते दागिने या रत्नपारखी ज्वेलर्समध्ये मिळतात. हे दालन आता मंगळवेढा तालुक्याची ओळख ठरली असल्याचे गौरवोद्गार इंग्लिश स्कूलच्या उपप्राचार्या तेजस्विनी कदम यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात मुंबई येथील तज्ज्ञ ज्योतिष सल्ल्यासह राशीनुसार मोफत भाग्यरत्नांची पारख करून दिली जाणार आहे. संचालक संदीप व जयदीप रत्नपारखी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी डॉ. निकिता सारडा, डॉ. तनुजा होनमाने, अश्विनी खटावकर, सुप्रिया जगताप, वंदना तोडकरी, डॉ. प्रीती शिर्के, डॉ. शबनम सय्यद, अमृता रत्नपारखी, डॉ. मोना रत्नपारखी, सायली रत्नपारखी, मोहिनी रत्नपारखी, सौरभ रत्नपारखी उपस्थित होते. (वा. प्र.)
----
फोटो : ०७ रत्नपारखी
रत्नपारखी ज्वेलर्सच्या महोत्सवाचे उद्घाटन करताना संगीता गुंजवटे. या वेळी डॉ. मोना रत्नपारखी, पूजा रावडे, तेजस्विनी कदम, वंदना तोडकरी, डॉ. शबनम सय्यद, सुनंदा आवताडे, डॉ. प्रीती शिर्के, डॉ. तनुजा होनमाने, सुप्रिया जगताप.