कन्नड अनुभव साहित्य परिषदेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:16 AM2021-06-28T04:16:31+5:302021-06-28T04:16:31+5:30
अक्कलकोट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, अक्कलकोटचे सी.बी. खेडगी महाविद्यालयातील कन्नड विभाग आणि सोलापूर जिल्हा शरण ...
अक्कलकोट : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, अक्कलकोटचे सी.बी. खेडगी महाविद्यालयातील कन्नड विभाग आणि सोलापूर जिल्हा शरण साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'कन्नड अनुभव साहित्य व व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावरील ऑनलाइन राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते झाले.
'वचन साहित्य आणि व्यक्तिमत्त्व विकास' या विषयावर कलबुर्गी येथील अप्पा कॉलेज ऑफ आर्ट कॉलेजचे व्याख्याता डॉ. आनंद सिद्दामणी यांनी पहिल्या सत्रात १२ व्या शतकात व्यक्तिमत्त्व विकासासाठी शरणांनी व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया रचल्याचे सांगितले. तसेच प्राचार्य डॉ. व्ही.एस. माळी (हारुगेरी), डॉ. राजशेखर जमदंडी (म्हैसूर), डॉ. श्यामला प्रकाश (मुंबई) यांनीही परिसंवादामध्ये आपले मत व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषण विद्यापीठ भाषा संकुलचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. विद्यापीठ कन्नड विभागाचे डॉ. गौरम्मा इलगंडी व प्रा. शिवानंद तडवळ, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गुरुसिद्धय्या स्वामी, सचिव शिवानंद गोगाव, मुंबई विद्यापीठ कन्नड विभागप्रमुख डॉ. जी.एन. उपाध्याय, डॉ. रमेश थेली, डॉ. रोळेकर नारायण, गायत्री पाटील, डॉ. गणपतराव कलशेट्टी, प्रा. विजयालक्ष्मी कुंभार, प्रा. देविका धट्टी, चेतना हेगडे, डॉ. श्यामला विदुषी, डॉ. सिद्धेश्वरी, भौरम्मा स्वामी, पद्मजा देसाई, प्रा. विलास अंधारे, दयानंद कोरे, डॉ.प्रो. शेट्टी, डॉ. पौर्णिमा शेट्टी सहभागी झाले होते.
--
महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्राच्या अनुदानासाठी पाठपुरावा : कुलगुरू
डॉ. फडणवीस म्हणाल्या, विद्यापीठे ही अशी केंद्रे नाहीत, जी विद्यार्थ्यांना फक्त पदवी प्रमाणपत्र देतात, तर येथून चांगली संस्कृती व मानवतेचे संस्कार होतात. या सावधगिरीने सेवा देण्यास विद्यापीठे बांधील आहेत. प्रत्येकाला समान अधिकार देणे, हेच व्यक्तिमत्त्व विकास होय. यासंदर्भात विद्यापीठांना त्यांच्या जबाबदा-या पार पाडाव्या लागतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अभ्यास केंद्रास अनुदान मिळण्यासाठी सरकारला निवेदन पाठविल्याचे सांगितले.