शंकरनगर येथे कोविड सेंटरचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:12+5:302021-05-27T04:24:12+5:30

अकलूज : शंकरनगर (ता. माळशिरस) येथे कोरोना रूग्णांसाठी २५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद‌्घाटन ...

Inauguration of Kovid Center at Shankarnagar | शंकरनगर येथे कोविड सेंटरचे उद‌्घाटन

शंकरनगर येथे कोविड सेंटरचे उद‌्घाटन

Next

अकलूज : शंकरनगर (ता. माळशिरस) येथे कोरोना रूग्णांसाठी २५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्याचे उद‌्घाटन बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

शंकरनगर ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये अर्जुन नगरातील जिल्हा परिषद शाळेत २५ बेडचे कोविड केअर सुरू केले आहे. यावेळी माजी उपसरपंच सत्यशील मोहिते-पाटील, उपसरपंच जयवंत माने, आरोग्य अधिकारी डॉ. ए. बी. आव्हाड, डॉ. शिरीष रणनवरे, डॉ. सौरभ गायकवाड, डॉ. रफीक शेख, डॉ. आनंद भोसले, डॉ. दत्तात्रय धाईंजे, डॉ. अभिजीत राजेभोसले, डॉ. सुनील गांधी, डॉ. आर. टी. देशमुख, तलाठी एन. एस. मोरे, ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. नवले, आरोग्यसेवक एम. ए. नेरकर, पोलीसपाटील फुले, आदी उपस्थित होते.

शंकर नगरमध्ये सध्या ४४ सक्रिय रुग्ण आहेत. या कोविड सेंटरसाठी सहा खासगी व तीन शासकीय असे ९ डॉक्टर सेवा देणार असून, दोन परिचारिका व वॉर्डबाॅय २४ तास रुग्णांची सेवा करणार आहेत. शंकरनगर आरोग्य केंद्रासह उपकेंद्रावरही लसीकरण सुरु करणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. ए. बी. आव्हाड यांनी सांगून आजअखेर २,७०० नागरिकांना लस दिल्याचे सांगितले.

Web Title: Inauguration of Kovid Center at Shankarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.