पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते स्थलांतरित पोलीस ठाण्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:21+5:302021-01-03T04:23:21+5:30

तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी १ मे २०१८ रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन सोमवार पेठेतील जुन्या पोलीस चौकीच्या ...

Inauguration of Migrant Police Station at the hands of police personnel | पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते स्थलांतरित पोलीस ठाण्याचे उद्घाटन

पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते स्थलांतरित पोलीस ठाण्याचे उद्घाटन

Next

तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी १ मे २०१८ रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशन सोमवार पेठेतील जुन्या पोलीस चौकीच्या इमारतीमध्ये सुरू केले. परंतु येथील इमारत अपुरी पडत असल्यामुळे १ जानेवारीपासून कांदलगाव रोड येथे स्थलांतरित केले. त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या उद्घाटन स्थळी आल्या. त्यांच्याच हस्ते उद्घाटन करण्याचे नियोजित होते. त्यानुसार तयारी झाली, परंतु त्यांनी अचानक आपले सहकारी कर्मचारी दिलीप ठोंगे यांना उद्घाटनाचा मान दिला.

यावेळी तेजस्वी सातपुते यांनी तालुक्यातील वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या बाबतीत केलेले नियोजन याचा आढावा घेतला.

वाढदिनी पोलिसांना मिळणार सुटी

उद्घाटनानंतर तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या, यापुढे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या वाढदिनी सुट्टी मिळेल आणि त्या कर्मचाऱ्याला शुभेच्छा पत्र दिले जाईल, असे सांगितले. पोलीस अधीक्षकांच्या अनपेक्षित कृतीने सर्व कर्मचारी भारावून गेले.

Web Title: Inauguration of Migrant Police Station at the hands of police personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.