शंभराव्या मराठी नाट्य संमेलनाचे सोलापुरात उद्धाटन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 27, 2024 01:50 PM2024-01-27T13:50:12+5:302024-01-27T13:50:18+5:30
येथील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात संमेलनाचा उद्घघाटन सोहळा संपन्न झाला.
सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचे शनिवारी सकाळी सोलापुरात थाटात उद्घघाटन झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल तसेच स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचे उद्धाटन झाले.
येथील नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात संमेलनाचा उद्घघाटन सोहळा संपन्न झाला. जगात सर्वात प्रभावी सुसंवाद माध्यम म्हणजे नाटक असल्याचे मत डॉ. जब्बार पटेल यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
या वेळी मराठी नाट्य परिषदेचे प्रशांत दामले, संमेलनाचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश यलगुलवार, ज्येष्ठ कलावंत मोहन जोशी, प्रा. शिवाजी सावंत, अभिनेत्री रिंकू राजगुरू, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, मोहन डांगरे, डॉ. बी. पी. रोंगे आदी उपस्थित होते.
संमेलनाच्या निमित्ताने मागील तीन दिवसांपासून सोलापुरात विविध नाटकांची मेजवानी सुरू आहे. रविवारी, २८ जानेवारी रोजी सायंकाळी संमेलनाचा समारोप होणार आहे.