सोलापूर रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
By Appasaheb.patil | Published: October 30, 2022 05:13 PM2022-10-30T17:13:21+5:302022-10-30T17:13:29+5:30
सोलापूर : राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याचा अनुषंगाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर ...
सोलापूर : राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याचा अनुषंगाने मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी महाराज यांच्या हस्ते जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय हिबारे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज दोहरे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस आयुक्त डॉ. राजेंन्द्र माने, केन्द्रीय संचार ब्यूरोचे फील्ड अधिकारी अंकुश चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि योगदान साजरे करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी बोलताना डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी महाराज म्हणाले की, “सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय संस्थानांच्या एकीकरणात आणि भारतीय संघराज्यात एकीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी प्रसिद्ध आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि योगदान दर्शविणारे आणि चित्रित करणारे हे प्रदर्शन भारताच्या एकता आणि अखंडतेचे सामर्थ्य प्रतिबिंबित करण्याचा मानस आहे, ज्यांचा उल्लेख मा. पंतप्रधानांनी २०२२ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त "पंच प्राण" म्हणून केला होता.
या प्रसंगी मध्य रेलवे सोलापूर विभागाच्या महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष सरीता दोहरे, उपाध्यक्षा स्वीटी परीहार, कौशल भगत, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जी. पी. भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक विवेक होके, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता संजय साळवे, उपमुख्य अभियंता प्रदीप बनसोड़े, सहाय्यक कार्मिक अधिकारी शेख मस्तान व इतर मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कल्याण निरिक्षक सचिन बनसोड़े, अजय सावंत, एस. आर. लवटे, अरविन्द खडाखड़े, प्रणव पवाड़े, अक्षय गर्दने, डी. डी. पवार, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मुख्य कल्याण निरिक्षक सचिन बनसोड़े यांनी केले .