सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी

By Appasaheb.patil | Published: October 9, 2022 04:24 PM2022-10-09T16:24:12+5:302022-10-09T16:24:42+5:30

रविवारी, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १८ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले.

Inauguration of Solapur University Youth Festival; Students were impressed with the theater and neat planning | सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे उदघाटन; रंगमंच, नेटक्या नियोजनाने भारावले विद्यार्थी

Next

सोलापूर :  युवा शक्ती ही अशक्याला शक्य करणारी मोठी ताकद आहे. युवाशक्तीच्या बळावरच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज या युवा शक्तीमुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

रविवारी, मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन आमदार अवताडे यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, यजमान महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. सुजित कदम, प्र कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणीक शाह, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, मीनाक्षी कदम, सचिवा प्रियदर्शनी कदम-महाडिक, पवन महाडिक, तेजस्विनी कदम, प्रा. शोभाताई काळुंगे आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविकात युवा महोत्सवात होणाऱ्या कलाप्रकारांची माहिती सादर करीत महोत्सव आयोजना मागचा हेतू स्पष्ट केला.

यावेळी आ. समाधान आवताडे, कुलगुरू डॉ. फडणवीस, पोलीस अधीक्षक सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, ॲड. सुजित कदम आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार ऍड. सुजित कदम यांनी मानले. 

 

Web Title: Inauguration of Solapur University Youth Festival; Students were impressed with the theater and neat planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.