उद्घाटन उरकले, मात्र कर्मचारी अन् औषधे नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:14+5:302021-05-20T04:24:14+5:30
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांना दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात झाला. रुग्णांना बेड मिळाले नाहीत मिळाले, तर ऑक्सिजन मिळाले नाही. रेमडेसिविर ...
उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांना दीड महिन्यापासून मोठ्या प्रमाणात झाला. रुग्णांना बेड मिळाले नाहीत मिळाले, तर ऑक्सिजन मिळाले नाही. रेमडेसिविर इंजेक्शन तर आगाऊ पैसे देऊनही मिळाले नाहीत. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. रुग्णांच्या नातेवाइकांना झालेला त्रास विसरण्याजोगा नाही. याचवेळी तालुक्यात ऑक्सिजन व साध्या बेडची शासकीय सोय होणे गरजेचे होते.
उशिराने कळमण आरोग्य केंद्रात २० ऑक्सिजन व ५० साध्या बेडची व्यवस्था झाली. मात्र, आरोग्य खात्याकडे पुरेसे कर्मचारीच नाहीत. स्वच्छतेसाठी कर्मचारी, औषधे व रुग्ण, तसेच नातेवाइकांना जेवणाची सोय झालेली नाही. यामुळे कळमण येथील ७० बेडचे हाॅस्पिटल सुरू होण्यास अडचण आहे.
----
रुग्णांना फायदा झाला नाही
आमदार यशवंत माने हे इंदापूर तालुक्यातील रहिवासी, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. मात्र, या संबंधाचा उत्तर सोलापूर तालुक्यातील कोरोनाबाधिताना फायदा झाला नाही. ना कोणाला रेमडेसिवर मिळाले ना ऑक्सिजन बेड. शिवाय मोठा खर्च करून उत्तर तालुक्यात कळमण येथे बेडची सुविधा झाली असली तरी कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर प्रशासनाला जाग आली. आगामी काळात हे केंद्र सुरळीत चालण्यासाठी पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.