शहीद चषक लेदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:34 AM2020-12-14T04:34:48+5:302020-12-14T04:34:48+5:30

पंढरपूर : शहीद जवान व वीरमरण प्राप्त झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहर व तालुका, ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व ...

Inauguration of Shaheed Cup Leather Cricket Tournament | शहीद चषक लेदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

शहीद चषक लेदर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Next

पंढरपूर : शहीद जवान व वीरमरण प्राप्त झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहर व तालुका, ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलिसांनी स्वत:च्या खिशातील पैसे काढून शहीद चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे, सपोनि. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी सुजित उबाळे, जनार्दन गरांडे, इलाही मुलाणी, मेहबूब इनामदार, स्वप्नील पवार, विजय आवटी, विनोद काळे, नितीन चवरे, मनोज खंडागळे, अविनाश रोडगे, रोहित टोणपे यांनी ५-५ हजार रुपयांची वर्गणी काढली आहे. या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला आहे. सहभागी होणाऱ्या संघासाठी कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही. तसेच तीन विजयी संघांना शहीद चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पालवी व नवरंगे बालकाश्रम या सामाजिक संस्थांना धान्य वाटप करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले.

फोटो ::::::::::::::::::::::::::::

शहीद चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, किरण अवचर, प्रशांत भस्मे, सपोनि. प्रशांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक. राजेंद्र गाडेकर आदी.

Web Title: Inauguration of Shaheed Cup Leather Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.