श्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:28 AM2020-08-05T02:28:13+5:302020-08-05T02:28:49+5:30

भारत भूमीत २९0 ठिकाणी भेटी : महाराष्ट्रातील विविध संस्थानाच्या प्राचीन यादीत भेटींचा उल्लेख

With the inauguration of Shri Ram, 45 places became holy | श्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन

श्रीरामांच्या पदस्पर्शाने ४५ ठिकाणे झाली पावन

Next

सोलापूर : श्रीरामांनी भारत भूमीत एकूण २९० ठिकाणी भेटी दिल्याचा उल्लेख श्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यासच्या यादीत आला आहे. विशेष म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील तब्बल ४५ स्थानांचा उल्लेख आहे. श्रीरामांनी त्यांच्या आयुष्यात चार वेळा प्रवास केला, असे सांगितले जाते. त्यांचा सर्वात मोठा प्रवास म्हणजे वनवासाचा होता. अयोध्या ते रामेश्वरम या त्यांच्या वनवास प्रवासात त्यांनी महाराष्ट्रातील ज्या-ज्या स्थानांना भेटी दिल्या, त्यातील बहुतांश ठिकाणी आजही राम मंदिरे आहेत.

नागपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, वाशीम, बुलढाणा, जालना, बीड, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद अन् सोलापूर आदी पंधरा जिल्ह्यांमध्ये त्यांनी भेटी दिल्याचा उल्लेख या संस्थानच्या यादीत आहे. १९९७ साली स्थापन झालेल्या या संस्थानचा उद्देशच सर्व रामभेट स्थळांची जपणूक करणे, असा आहे. या संस्थेचा कारभार अयोध्या येथील महंत नृत्य गोपाल दास महाराज यांच्या नेतृत्वाखाली चालतो.

सांस्कृतिक शोध संस्थान न्यासच्या यादीत राज्य
राळेगाव सीता मंदिर-यवतमाळ, उणकेश्वर शरभंग आश्रम-नांदेड, माहुर जमदग्नि आश्रम-नांदेड, रिठद राममुर्डेश्वर मंदिर -वाशीम, पंचाप्सर लोणार-बुलढाणा, सिंदखेडराजा रामेश्वर-बुलढाणा, नागरतास-जालना, सावरगाव शंभु महादेव-जालना, कुंडलिनी रामतीर्थ-जालना, अंबड सीता नहानी-जालना, रामेश्वर मंदिर रामसगाव- जालना, शनैश्वर मंदिर राक्षस भुवन-बीड, अगस्ती आश्रम अंकई किल्ला-नाशिक, रामेश्वर पाटौदा-नाशिक, पिंपळनेर नाशिक, पंचवटी -नाशिक, जनस्थान-नाशिक, म्हसरूल सीता सरोवर- नाशिक, आसेवाडी रामशेज पर्वत -नाशिक, कुशावर्त तीर्थ त्र्यंबकेश्वर-नाशिक, रामकुण्ड-नाशिक, बाणेश्वर नांदूर-नाशिक, मृगव्याधेश्वर नांदूर-नाशिक, मध्यमेश्वर नांदूर-नाशिक, रामेश्वर खाडगांव-नाशिक, रामेश्वर कायगाव टोका -औरंगाबाद, घटेश्वर प्रवरा संगम-अहमदनगर, मुक्तेश्वर कायगाव-नगर, सिद्धेश्वर प्रवरा संगम-नगर, ठाणठाणेश्वर कोठुर-नगर, सर्वतीर्थ घोटी-नाशिक, वालुकेश्वर मंदिर मलाबार हिल्स-मुंबई, राम दरिया कार्लाजवळ-पुणे, शिरुर रामलिंग देवस्थानम -पुणे, रामेश्वर सौताडा-बीड, तुळजापूर घाटशीळ मंदिर -उस्मानाबाद, रामतीर्थ नळदुर्ग-उस्मानाबाद, रामतीर्थ किणीगाव-सोलापूर.

Web Title: With the inauguration of Shri Ram, 45 places became holy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.