अबोला धरल्याने गरोदर पत्नीस पेटविले, मोहोळ येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:39 PM2018-09-27T12:39:25+5:302018-09-27T12:42:32+5:30

The incident happened in Mohol, due to the abolishment of the pregnant wife | अबोला धरल्याने गरोदर पत्नीस पेटविले, मोहोळ येथील घटना

अबोला धरल्याने गरोदर पत्नीस पेटविले, मोहोळ येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे- मोहोळ येथील रेल्वे स्टेशन परिसरातील घटना- गरोदर महिला ७० टक्के भाजली- आग विझविताना पती समाधान गायकवाड जखमी

सोलापूर : तु मला बोलत का नाहीस असे म्हणून रागाच्या भरात पतीने गरोदर असलेल्या पत्नीस पेटवून दिल्याची घटना मोहोळ येथील रेल्वे स्टेशन परिसरात बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली.

सखुबाई समाधान गायकवाड (वय २५) असे जखमी महिलेचे नाव आहे़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पती समाधान भागवत गायकवाड (वय ३0 ) हा मोहोळच्या नगरपालिकेत कामास आहे़ नियमितपणे काम करून रात्री घरी आल्यानंतर पत्नी सखुबाई ही बोलत नसल्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले.

 यावेळी रागाच्या भरात पती समाधान याने पत्नी सखुबाई हिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले़  पत्नी पेटल्यानंतर तिला विझविण्यासाठी पती समाधान याने प्रयत्न केला मात्र तोही त्यात जखमी झाला़ 
या घटनेनंतर दोघांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात बहिण शोभा शिंदे हिने दाखल केले़ समाधान हिची पत्नी सखुबाई गायकवाड ही पाच महिन्याची गरोदर असून लागलेल्या आगीत ती ७० टक्के भाजल्याचे पोलीसांनी सांगितले़ याबाबत सिव्हील पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे़ 


 

Web Title: The incident happened in Mohol, due to the abolishment of the pregnant wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.