ट्रॅक्टर नदीपात्रात कोसळून चालकांचा जागीच मृत्यू, सांगोलाजवळील कोरडा नदी पुलावरील घटना
By admin | Published: April 18, 2017 06:10 PM2017-04-18T18:10:22+5:302017-04-18T18:10:22+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १८ : भरधाव ट्रॅक्टरचे चाक अचानक पंक्चर झाल्याने ट्रॅक्टर पुलावरून नदीपात्रात कोसळून चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवार १७ एप्रिल रोजी मध्यरात्री जवळा-सोनंद रोडवरील कोरडा नदी पुलावर घडला आहे. कैलास शिवाजी भोसले-२४, रा.खोमनाळ (ता.मंगळवेढा)असे अपघातात ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
खोमनाळ येथील कैलास शिवाजी भोसले हा एम.एच.१३-जे.३१६८ हा ट्रॅक्टर सोमवारी रात्रौ साडेदहाच्या सुमारास जवळ्याकडून सोनंद रोडवरील केदार यांच्या पेट्रोलपंपावर कामानिमित्त घेवून गेला होता. मात्र पंपावर ट्रॅक्टरचे दुकान बंद असल्याने कैलास भोसले यांनी परत ट्रॅक्टर घेवून तो शिरशीकडे निघाला होता. यावेळी, भरधाव ट्रॅक्टर कोरडा नदीच्या पुलावरून जात असताना अचानक ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने व ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो नदीपात्रात कोसळल्याने हा अपघात घडला. अपघातात कैलास शिवाजी भोसले गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. बाबासाहेब अंबादास बाबर यांनी अपघाताची माहिती ट्रॅक्टर मालक उत्तम शामराव भुसे यांना मोबाईलवरुन दिली. पोलीसांनी ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याने तो स्वत:च स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरला असे फियार्दीत नमूद केले आहे. उत्तम शामराव भुसे यांनी पोलीसात खबर दिली असून तपास हवालदार आप्पा कर्चे करीत आहेत.