वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 02:25 PM2020-07-23T14:25:29+5:302020-07-23T14:48:37+5:30

अवैध वाळू उपशांवर महसूल विभागाची कारवाई; तिघांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल

Incidents in Pandharpur; Attempt to put a car on the body of a woman tehsildar | वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

वाळू तस्करांची मुजोरी; महिला तहसिलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा केला प्रयत्न

Next
ठळक मुद्देही घटना सांगोला जँकवेल परिसर (पंढरपूर ता. पंढरपुर जि सोलापुर) घडलीपथकातील कर्मचाºयांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्नपर्यावरण संरक्षण कायदा क. ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

पंढरपूर : येथील भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणाºया वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसिलदार वैशाली वाघमारे यांच्यासह पथकातील कर्मचाºयांच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न वाळू चोरांनी केला आहे. ही घटना २१ जुलै रोजी साडे अकराच्या सुमारास सांगोला जँकवेल परिसर (पंढरपूर ता. पंढरपुर जि सोलापुर) घडली आहे.

दरम्यान, तहसिलदार वैशाली वाघमारे या तलाठी मुसाक काझी, कैलास भुसिंगे व प्रशांत शिंदे यांच्यासह अवैद्य वाळु उपसा व वाहतूक होत असलेल्या भीमा नदीपात्रातील जॅकवेल परिसरात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या व त्यांच्या पथकातील कर्मचाºयांच्या अंगावर व त्यांचे ताब्यातील वाहनांवर देखील बिगर नंबरची वाहने घालून दुखापत करण्याच व जिवाला धोका होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकरणी आण्णा पवार, ग्यानबा धोत्र व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात  भा.दं.वि.कलम ३०७ ३५३, ३३२, ३७९, ५०६, ३४ पर्यावरण संरक्षण कायदा क. ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.

Web Title: Incidents in Pandharpur; Attempt to put a car on the body of a woman tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.