महोत्सवात पोवाडा, जलसा, भारुड कलाप्रकाराचा समावेश करा, दलित पँथरची मागणी
By संताजी शिंदे | Published: September 13, 2023 04:50 PM2023-09-13T16:50:10+5:302023-09-13T16:51:08+5:30
सोलापुर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सदर लोककलेला आश्रय मिळावा म्हणून आम्ही वारंवार प्रयत्नशील आहोत.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने यंदाच्या वर्षी घेण्यात येत असलेल्या, १९ व्या युवा महोत्सवामध्ये पोवाडा, जलसा, भारुड व कव्वाली सारख्या पारंपारिक कला प्रकाराचा समावेश करावा अशी मागणी दलित पॅंथरच्या वतीने कुलगुरूकडे करण्यात आली आहे.
पोवाडा,जालसा,भारूड,कव्वाली अश्या मातीतल्या लोककलेला वाव देण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी आजचा युवका हा पुढे सरसावला पाहीजे. याच उद्दात्त हेतूने युवकांना प्रेरित करण्यासाठी आणि त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, गेल्या ४-५ वर्षांपासून युवा पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने, विद्यापीठ प्रशासनाला वारंवार निवेदने दिलेआहेत. तरी सुद्धा गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या विद्यापीठ प्रशासनाला सदर लोककलेची किव वाटली नाही.
सोलापुर विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये सदर लोककलेला आश्रय मिळावा म्हणून आम्ही वारंवार प्रयत्नशील आहोत. परंतू या यापूर्वीच्या कुलगुरूंना या मध्ये कलाकार दिसला नसावा..? अशी शंका विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहे. सदर कलाकार प्रकार हे एस.आर.टी युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी, बी.ए.एम. युनिव्हर्सिटी युवा महोत्सवात सादर होतात. पु.आ.हो.सोलापुर विद्यापीठामध्येच या कलाप्रकारास ऊपेक्षित का ठेवले जात आहे.? विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन सदर कलाप्रकार युवा महोत्सवामध्ये तात्काळ सामिल करुन घ्यावेत. अन्यथा लोककलेच्या संवर्धनाकरिता प्रशासनाविरोधात आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.