मंगळवेढा आगाराच्या १४२ फेऱ्यांतून ५ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:28 AM2021-08-18T04:28:36+5:302021-08-18T04:28:36+5:30
एसटीची प्रवासी सेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीला त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती. मात्र, अनलॉक होताच आगार प्रमुख मधुरा जाधवर यांच्या ...
एसटीची प्रवासी सेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीला त्याकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती. मात्र, अनलॉक होताच आगार प्रमुख मधुरा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली आगाराची सेवा पूर्वपदावर येण्यासाठी स्थानक प्रमुख गुरुनाथ रणे, वाहतूक निरीक्षक अश्विनी एकबोटे, सुभाष राठोड, वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक प्रयत्न करीत आहेत. आगाराची बससेवा ७७ टक्के सुरळीत झाली आहे. मंगळवेढा-पुणे, मंगळवेढा-सोलापूर, मंगळवेढा-पंढरपूर या बससेवेला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे, तर ग्रामीण भागात आठ मार्गांवर ग्रामीण सेवा नियमित सुरू आहे. मुंबई, पुणे यासह लांब पल्ल्याच्या बसही सुरू झाल्या आहेत, तर आठ गावांत ग्रामीण भागात मुक्कामी बस सुरू झाल्या आहेत. प्रवासी संख्या वाढेल तसे ग्रामीण भागातील बसफेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.
---
विद्यार्थ्यांना अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ
ग्रामीण भागात कोरोनामुक्त झालेल्या गावांत माध्यमिक विद्यालय सुरू करण्यात आले आहे. अहिल्याबाई होळकर योजनेद्वारे सवलतीच्या दरातील पास सुविधाही सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना होऊन फेऱ्या पूर्वस्थितीत येण्यासाठी आगाराचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच लग्न समारंभ, धार्मिक विधी आदी कार्यक्रमांसाठी नागरिकांकडून आगाराशी प्रासंगिक करार करून बसची सेवा पूर्ववत सुरू केली आहे.
----
मंगळवेढा आगाराची ७७ टक्के बससेवा सुरळीत झाली आहे. नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड नोंदणीसुद्धा पूर्ववत सुरू केली आहे. प्रासंगिक करार, विद्यार्थी पास, मालवाहतूक योजना सुरू केली आहे. प्रवासी, व्यापाऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. -
गुरुनाथ रणे, स्थानक प्रमुख, मंगळवेढा