अक्कलकोटमध्ये सराफ दुकानावर आयकर विभागाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:20 AM2021-03-20T04:20:53+5:302021-03-20T04:20:53+5:30
अक्कलकोट येथे हिरोळीकर यांचे अभिनंदन ज्वेलर्स दुकान आहे. पन्नास वर्षांपासून शहरातील मोठ्या व्यापारी म्हणून त्यांची गणना होते. यांच्या दुकानावर ...
अक्कलकोट येथे हिरोळीकर यांचे अभिनंदन ज्वेलर्स दुकान आहे. पन्नास वर्षांपासून शहरातील मोठ्या व्यापारी म्हणून त्यांची गणना होते. यांच्या दुकानावर यापूर्वी अनेक वेळा धाड पडली असली तरी एक वर्षात दुसऱ्यांदा धाड पडल्याचे व्यापाऱ्यांतून बोलले जात आहे. ही धाड ‘मनी लँडिंग (सावकारी व्यवसायामूळे) पडल्याचे चर्चिले जात आहे.
दुपारी १२ वाजता पुणे पासिंगच्या कारमधून चार अधिकाऱ्यांचे पथक आले. त्यांनी थेट दुकानात घुसून दप्तर तपासणीला सुरुवात केली. दुकानात विक्री, एन्ट्री व उपलब्ध सोने,चांदी स्टॉकची तपासणी सुरु होती.
----
तर्कवितर्कांना उधाण
सदर धाड गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांनी नुकताच कारखान्याचा आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची चर्चा होत होती. त्यांना हिरोळीकर यांनी काही रक्कम व्याजाने दिल्याची चर्चा त्यानंतर सुरु होती. त्याच्या सखोल चौकशीसाठी ही धाड पडली असावी याबद्दल नागरिकांमधून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
१९अक्कलकोट-रेड
अक्कलकोट येथील याच हिरोळीकर सराफ दुकानावर आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली.