उत्पन्न दोन लाख तर खर्च साडेसात लाख, सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:39 PM2017-10-25T15:39:44+5:302017-10-25T15:41:09+5:30

मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. 

The income is two lakh and the expenditure is Rs. 7.5 lakh, the Solapur Municipal Transport Department is in charge | उत्पन्न दोन लाख तर खर्च साडेसात लाख, सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा अजब कारभार

उत्पन्न दोन लाख तर खर्च साडेसात लाख, सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाचा अजब कारभार

Next
ठळक मुद्देसोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची मदत मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २४ : मनपा परिवहनचे (एसएमटी) दररोज दोन लाख उत्पन्न तर खर्च साडेसात लाख आहे. अशाही परिस्थितीत परिवहनची सेवा सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती प्रभारी परिवहन व्यवस्थापक अभिजित हराळे यांनी दिली. 
आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी परिवहन व्यवस्थापकाची जबाबदारी सहायक आयुक्त हराळे यांच्यावर दिली आहे. सध्या दिवाळी सानुग्रह अनुदान, उचल आणि पाच महिन्यांचा थकीत पगार द्यावा, यासाठी कर्मचाºयांनी सात रस्ता डेपोसमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे. अशा परिस्थितीत पदभार घेतलेल्या हराळे यांनी कर्मचाºयांच्या बैठकांवर बैठका घेऊन परिस्थिती सुधारण्यावर भर दिला आहे.
 मंगळवारी मुख्य तिकीट निरीक्षक भारत कंदकुरे व प्रशासनातील अधिकाºयांची बैठक घेऊन उत्पन्नवाढीसाठी मार्गाचे नियोजन केले. 
सध्या ४१ बस मार्गावर आहेत. यातून दररोज दोन लाख उत्पन्न मिळत आहे. पण खर्च मात्र साडेसात लाख आहे. साडेपाच लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी आणखी  दहा गाड्या मार्गावर आणण्यात येतील. त्याचप्रमाणे प्रवासी वाढविण्यासाठी शहरातून रिक्षात होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त महादेव तांबडे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची मदत घेण्याचे ठरविण्यात आले. 
सोलापूर दर्शन ही बस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. साखर कारखाना व सैफुलदरम्यान शटल बससेवा सुरू करून उत्पन्नवाढीवर भर देण्यात येणार असल्याचे हराळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कर्मचाºयांना विश्वासात घेऊन जगण्यासाठी आहे त्या परिस्थितीशी लढू ही भूमिका घेऊन काम करणार आहे. 
-------------------------
संपात बस बंद नाही
Èभारी व्यवस्थापक हराळे यांनी मंगळवारी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अशोक जानराव यांची भेट घेऊन लाक्षणिक संप मागे घेण्याबाबत विनंती केली. त्यावर जानराव यांनी आंदोलन सुरू राहील, मात्र बस बंद ठेवून लोकांची गैरसोय केली जाणार नाही, याची हमी दिली. कर्मचाºयांचे थकीत वेतन मिळाले पाहिजे, ही मागणी न्याय्य आहे. यासाठी मनपाकडे असलेल्या थकीत रकमांबाबत पाठपुरावा करू. पण यापुढे वेतनासाठी मनपावर अवलंबून न राहता, दररोजच्या उत्पन्नातून ५० हजार वेतनासाठी काढून ठेवण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: The income is two lakh and the expenditure is Rs. 7.5 lakh, the Solapur Municipal Transport Department is in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.