पोलीस ठाण्यात पाण्याची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:45+5:302021-03-26T04:21:45+5:30
सामाजिक संस्थेेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यास फ्रीज, आरओ हे दुरुस्तीअभावी अडगळीत आहेत. त्याचठिकाणी प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. ग्रामीण भागातून ...
सामाजिक संस्थेेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यास फ्रीज, आरओ हे दुरुस्तीअभावी अडगळीत आहेत. त्याचठिकाणी प्लास्टिक बाटल्यांचा खच पडला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिक महिला आबालवृद्धांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी केली आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनला भेट दिलेला थंड पाण्याचा कूलर, आरओ अनेक दिवसांपासून तो दुरुस्तीअभावी अडगळीत आहे, तर याठिकाणी रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे. त्याच्याकडे लक्ष द्यायला ना अधिकाऱ्याला वेळ आहे न पोलीस कर्मचाऱ्यांना ! पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांना पोलीस स्टेशनला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी पत्रकारांसमोर पोलीस कर्मचाऱ्यांना तो बंद अवस्थेतील थंड पाण्याचा कूलर दुरुस्त करून पाणी उपलब्ध करा, अशा सूचना केल्या होत्या. अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी, अशी मागणी शिवसेनेचे कमरुद्दीन खतीब यांनी केली आहे.
फोटो ओळ - सांगोला पोलीस स्टेशनच्या इमारतीवर दुरुस्तीअभावी बंद अवस्थेतील थंड पाण्याच्या कूलरचे छायाचित्र.