बार्शी तालुक्यात दोन दिवसात ४८ कोरोनाबधितांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:16+5:302021-03-14T04:21:16+5:30
गेल्या सहा दिवसात शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ६९ एवढा आहे. तालुक्यातील आतापर्यंतच्या बाधितांची ...
गेल्या सहा दिवसात शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा ६९ एवढा आहे.
तालुक्यातील आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या ७ हजार १०० झाली आहे. बरे होऊन ६ हजार ७७३ जण घरी गेले आहेत. २१० जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
शहर व तालुक्यात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्याची संख्या देखील वाढवण्यात आली आहे.
तालुक्यातील ११७ जणांवर उपचार सुरू आहेत. बार्शी शहर मोठी व्यापारी पेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानात गर्दी करणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. तरी देखील कित्येक लोक विनामस्क फिरत आहेत. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लग्न समारंभात कोरोना नियमाचे पालन केले जात नाही.
----