मागील वर्षभरात गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:23 AM2021-03-23T04:23:47+5:302021-03-23T04:23:47+5:30
गेल्या दोन वर्षांत सांगोला पोलीस स्टेशनअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात घरफोडी, फसवणूक, चोरी, चेन स्नॅचिंग, मटका, अवैध दारू विक्री, ...
गेल्या दोन वर्षांत सांगोला पोलीस स्टेशनअंतर्गत ग्रामीण व शहरी भागात घरफोडी, फसवणूक, चोरी, चेन स्नॅचिंग, मटका, अवैध दारू विक्री, गुटखा, खासगी सावकारी, अवैध वाळू उपसा, शेतीच्या हद्दीवरून भांडणे, मारामारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, आत्महत्येस प्रवृत्त करणे, वाहन चोरी, फसवणूक, विनयभंग, महिलांचा छळ या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यासाठी जोरदार शोधमोहीम राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेत गुन्हेगारांवर वचक कायम ठेवण्यासाठी पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे. सांगोला शहर व तालुक्यात गुन्ह्यांच्या तुलनेत त्याचा शोध घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. हीच बाब खुद्द पोलिसांकडेच असलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.
दाखल गुन्ह्यांची आकडेवारी
सन २०१२ मध्ये ५४१, २०१३ मध्ये ६३८, २०१४ मध्ये ८३३, २०१५ मध्ये ७७९, २११६ मध्ये ९२३, २०१७ मध्ये १०३४, २०१८ मध्ये ११७३, २०२९ मध्ये १४३८, २०२० मध्ये १६६० या आकडेवारीनुसार गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढतच गेले आहे.
कोट ::::::::::::::::::
लोकसंख्येसह दळणवळणाची साधने वाढली. लोकांमध्ये जागृती होऊन सोशल मीडिया कम्युनिकेशनाचा पुरेपूर उपयोग करून घेत अगदी किरकोळ स्वरूपाचे भांडण झाले तरी लोक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात, हेही गुन्हे वाढण्यामागचे कारण आहे. गुन्ह्यांची उकल होते; परंतु चोऱ्या, ऑनलाईन फसवणूक, दुचाकी चोरी या गुन्ह्यांचा तपास होण्यास वेळ लागतो. प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- भगवानराव निंबाळकर
पोलीस निरीक्षक, सांगोला.