डॉक्टरांचा सल्ला; प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:57 AM2020-03-21T11:57:14+5:302020-03-21T11:59:44+5:30

फळे, पालेभाज्या आणि हवी व्यवस्थित झोप; कोरोनाला जिंकायचा असेल, तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे

Increase immunity; Defeat Corona! | डॉक्टरांचा सल्ला; प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा ! 

डॉक्टरांचा सल्ला; प्रतिकारशक्ती वाढवा; कोरोनाला हरवा ! 

Next
ठळक मुद्देआहार, विहार, निद्रा अशा अनेक गोष्टींबाबत बारकाईने पाहणे गरजेचे आहेत्या-त्या मोसमातील फळे, भाज्या आहारात ठेवल्या तरीही फार मोठा फरक पडतोकोरोनाला जिंकायचा असेल, तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे

सोलापूर : ‘कोरोनाचा धसका बसला असला, तरी काळजी करायचे कारण नाही. तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच काय, कोणताही साथीचा आजार तुमच्यासमोर टिकणारच नाही,’ असा विश्वास ‘प्रतिकारशक्ती’ या विषयावर डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.

‘भारतीय आहार घ्या व नीट झोप घ्या अशा दोनच गोष्टी करा; तुमची प्रतिकारशक्ती वाढेल,’ असे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाचा विषाणू शरीरात शिरला, की तो प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो व शरीराला नामोहरम करतो. प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर कोरोनाच्या विषाणूने विशेष फरक पडणार नाही, असे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून सातत्याने सांगण्यात येत आहे. 

ही प्रतिकारशक्ती म्हणजे काय? याविषयी काही डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी भारतीय आहार पद्धतीचे महत्त्व उलगडून दाखविले. गेल्या काही वर्षांत घराबाहेरच्या खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील मेदाचे प्रमाण वाढून प्रतिकारशक्ती कमी होत चालली असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. विशेष म्हणजे, आयुर्वेदिक व अ‍ॅलोपथी या दोन्ही उपचार पद्धतींमधील डॉक्टरांचे एरवी औषधोपचारांबाबत मतभेद असले, तरी याविषयी मात्र एकमत आहे. 

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी  डॉ. सूर्यकांत कांबळे म्हणाले, ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरात बाहेरून प्रवेश करणाºया विषाणू किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत क्षमता. ती काही जन्मजात नसते. ती कमी-जास्त होते; मात्र त्याला ती व्यक्तीच कारणीभूत असते. अतिश्रम, आहार वेळेवर नसणे, चुकीचा म्हणजे अती तिखट- अती तेलकट असा असणे, त्यात बदल न करणे, झोप पुरेशी न घेणे या सगळ्या गोष्टी प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत ठरतात. असे केले नाही, तर प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढते. 

मोसमी फळे, पोळी-भाजी, त्यातही पालेभाज्या व ताक, असा आहार आणि पुरेशी झोप घेतली, तर प्रतिकाराच्या क्षमतेत वाढ होते व असा किमान साथीचा म्हणजे संसर्गजन्य आजार तरी त्वरित होणार नाही.’’ ‘‘प्रतिकारशक्ती म्हणजे शरीरातील वेगवेगळी प्रथिने (प्रोटिन), कर्बोदके (कार्बोहायड्रेड), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन)  यांचे प्रमाण व्यवस्थित असणे. ते नीट असले तर प्रतिकारशक्ती चांगली असते व त्यामुळे शरीर कोणत्याही विषाणूचा सक्षमपणे प्रतिकार करू शकते.

ताज्या फळांचा रस किंवा ती खाल्ली तरीही प्रतिकारशक्तीत वाढ होते. मात्र, आपण फळे खात नाही. थंड झालेले अन्न प्रतिकारशक्तीचा ºहास करीत असते. गरम अन्न खाल्ले, तर त्यातील सर्व घटक शरीराला मिळतात. या सर्व गोष्टींच्या जोडीला व्यायामही हवा. तो नियमित असला तर चांगलेच.’’

प्रतिकारशक्ती कशी वाढवायची?

  • - हंगामातील ताजी फळे खाणे किंवा त्यांचा रस पिणे.
  • - पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश करणे.
  • - जेवणातील सर्व पदार्थ ताजे व गरम खाणे.
  • - जेवणाच्या वेळांचे पालन करणे.
  • - मोकळ्या, शुद्ध हवेत नियमित व्यायाम करणे.
  • - प्राणायामाद्वारे फुप्फुसातील शक्ती वाढवणे
  • - किमान सहा तासांची शांत झोप घेणे.

प्रतिकारशक्ती कमी कधी होते?

  • - शिळे व थंड झालेले अन्न खाणे.
  • - तळलेले, तिखट पदार्थ सातत्याने खाणे.
  • - फ्रिजमधील पदार्थांचे नियमित सेवन करणे.
  • - फळांमधून मिळणाºया जीवनसत्त्वांची कमतरता.
  • - पालेभाज्या, कडधान्ये यातून मिळणाºया प्रथिनांचा अभाव.
  • - पुरेशी झोप न होणे.

प्रतिकारशक्ती  म्हणजे काय?

  • - श्वास किंवा घशावाटे शरीरात येणाºया बाहेरच्या विषाणूंना प्रतिकार करण्याची शरीराची क्षमता
  • - शरीरावर आघात करणाºया या विषाणूंना शरीरात आधीच असलेल्या पेशी निष्प्रभ करतात
  • - विषाणूंचा हल्ला बराच वेळ चालला तरीही त्यांच्यासमोर टिकाव धरण्याची शरीरातंर्गत क्षमता 
  • - कोणतेही औषध न घेता विषाणूंना निष्प्रभ करण्याची शरीराची शक्ती

आहार, विहार, निद्रा अशा अनेक गोष्टींबाबत बारकाईने पाहणे गरजेचे आहे. त्या-त्या मोसमातील फळे, भाज्या आहारात ठेवल्या तरीही फार मोठा फरक पडतो. रोज किमान सहा तासांची झोप आवश्यक आहे. नोकरी, उद्योग-व्यवसाय व एकूणच जगण्याच्या लढाईत नेमके चांगले जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींकडेच आपण दुर्लक्ष करतो. त्यातून प्रतिकारशक्ती कमी होते व आजारांचा सामना करावा लागतो. कोरोनाला जिंकायचा असेल, तर खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.     
- डॉ. सूर्यकांत कांबळे
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी

Web Title: Increase immunity; Defeat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.